नागपूर: विदर्भातील उद्योजकांनी वीज दरवाढीबाबत कोणतीही चिंता करु नये. कारण मीच पुढील पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री होणार आहे, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते शनिवारी विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या पुरस्कार सोहळ्यावेळी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, वीज दरवाढीबाबत विदर्भ व मराठवाड्यातील उद्योजकांनी चिंता करू नये. मीच पुढील पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री होणार आहे. त्यामुळे सरकार तुमच्या पाठीशी कायम उभे राहील, अशी ग्वाही फडणवीसांनी दिली.
विदर्भ व मराठवाडा व अनुसूचित क्षेत्रात उद्योगांना चालना मिळावी, म्हणून वीज दरात सवलत दिली आहे. या सवलतीची मुदत २०१९ मध्ये संपत आहे. त्यामुळे भविष्यात काय होणार, असा प्रश्न उद्योजकांना सतावत होता. मात्र, आता मुख्यमंत्र्यांनीच आश्वासन दिल्यामुळे उद्योजक निश्चिंत झाले आहेत.