close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या भावाची हत्या

मुलीच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न दुसरीकडे लाऊन दिले तेंव्हापासून आरोपी सुरज संतप्त होता.

Updated: Aug 31, 2018, 08:31 PM IST
एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या भावाची हत्या

नागपूर: कुही तालुक्यातील खैरांजली गावात एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या भावाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी सुरज पाटील याला ताब्यात घेतले आहे. 

वेलतूर पोलीस स्टेशन हद्दीतील खैरलांजी गावात राहणाऱ्या सुरज पाटीलचे गावातील एका तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. तरुणीला लग्नासाठी त्याने मागणीही घातली होती. मात्र, मुलीच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न दुसरीकडे लाऊन दिले तेंव्हापासून आरोपी सुरज संतप्त होता. गुरुवारी रात्री तरुणीचा भाऊ अमोल मेश्राम हा मद्यधुंद अवस्थेत असताना आरोपी सुरजने धारदार काचेने त्याच्या छातीवर वार केले. यामध्ये अमोलचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर सूरजने तेथून पळ काढला. 

गस्तीवर असलेल्या पोलिसांना अमोलचा मृतदेह आढळून आला. तपासाची चक्रे फिरवत केवळ तीन तासातच पोलिसांनी आरोपी सुरज पाटीलला बेड्या ठोकल्या.