पुणे: दहीहंडीची वर्गणी न दिल्याने मित्राच्या दुचाकीवर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना पुण्यातील आंबेगावमध्ये घडली. यपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रफुल्ल थोरातनं दहीहंडीची वर्गणी न दिल्याचा राग मनात ठेऊन त्याच्याच चार मित्रांनी गाडीवर पेट्रोल टाकून गाडी पेटवून दिली. या गाडीची किंमत साधारण एक लाख १० हजार रुपये इतकी होती.
याप्रकरणी भारती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर पोलिसांनी दत्ता शिंदे, ओकार संदीप कांबळे, दत्ता राहुल कदम आणि सुमित राजू अहिवले या चौघांना ताब्यात घेतले आहे.