खुशखबर! मुंबई आणि पुण्यात मान्सून दाखल

हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार मुंबई, पुणे, मध्य महाराष्ट्र, कोकण हा सारा भाग आज मान्सूननं व्यापून टाकला आहे. काही वेळापूर्वीच पुणे वेधशाळेनं ही माहिती दिली आहे.

Updated: Jun 12, 2017, 03:58 PM IST
खुशखबर! मुंबई आणि पुण्यात मान्सून दाखल title=

मुंबई : हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार मुंबई, पुणे, मध्य महाराष्ट्र, कोकण हा सारा भाग आज मान्सूननं व्यापून टाकला आहे. काही वेळापूर्वीच पुणे वेधशाळेनं ही माहिती दिली आहे.

कोकणातल्या बाजूनं मुंबईत तर साता-याकडून पुण्यात दाखल झालेल्या मान्सूनच्या सरी दुपारी दीडच्या सुमारास जोरात बरसल्या. येत्या 24 ते 48 तासात मुंबईत पाऊस दाखल होईल असा अंदाज कुलाबा वेधशाळं आधीच वर्तवला होता. त्यानुसार आज मान्सूनचं मुंबईतही आगमन झालं आहे. 2016 च्या तुलनेत मान्सून आठ दिवस आधीच मुंबईत पोहचला आहे. पण गेल्या वर्षी ही तारीख 20 जून होती. तर त्याआधीच्या म्हणजे 2015 मध्ये मान्सून आजच्या म्हणजे १२ जूनला मुंबईत दाखल झाला होता.