Saroj Patil on Sharad Pawar Retirement: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी अध्यक्षपदावरुन निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. ‘लोक माझे सांगाती’ या (Lok Maze Sangati) आत्मचरित्राचा दुसरा भाग प्रकाशनाच्या कार्यक्रमानंतर शरद पवार यांनी पक्षाचं अध्यक्षपद सोडणार असल्याची घोषणा केली आहे. शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर नेत्यांना अश्रू अनावर झाले. शरद पवारही भावूक झाले. रद पवार यांच्या बहीण सरोज पाटील यांना देखील शरद पवार यांचा हा निर्णय पटलेला नाही. राजीनामा मागे घ्यावा अशी मागणी सरोज पाटील यांनी केली आहे.
शरद पवारांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा याचे मला अतिशय दुःख वाटत आहे. शरद पवार यांनी राजीनामा परत घ्यावा ,असे मत शरद पवार यांच्या बहीण सरोज पाटील यांनी व्यक्त केले आहे. त्या इस्लामपूर मध्ये बोलत होत्या.
शरद पवार यांच्या आजच्या निर्णयाने महाराष्ट्राचे खूप नुकसान होईलच,पण राष्ट्रवादी पक्षही दुबळा होईल ,असे मत देखील शरद पवार यांच्या बहिण सरोज पाटील यांनी व्यक्त केले आहे.
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार, अशी मोठी घोषणा पवारांनी केली. संसदीय राजकारणातून पवार निवृत्त होतायत. यापुढे निवडणूक लढवणार नाही. राज्यसभेची आता तीन वर्षं राहिलीयत त्यानंतर आता नवी जबाबदारी घेणार नाही, असं शरद पवारांनी म्हटलं. पवारांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या पुनर्प्रकाशनाचा कार्यक्रम मुंबईत यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडला. त्यावेळी शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा केली.
शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा करताच सभागृहामध्ये एकच गोंधळ झाला. पवारांनी निवृत्तीची घोषणा मागे घ्यावी, अशा घोषणा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सुरू केल्या. शरद पवार मंचावर असतानाच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक आणि भावनाविवष झाले. कार्यकर्ते मंचावर गेले आणि पवारांनी निवृत्तीची घोषणा मागे घेण्याची विनंती करु लागले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. या कार्यकर्त्यांना नियंत्रणात आणणं प्रचंड कठीण जात होतं.
पवार राजकारणात थांबणार असतील, तर आम्ही थांबू नाही तर पक्ष ज्याला चालवायचा त्याला चालवू दे, असं जयंत पाटलांनी म्हटलं.... पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर बोलताना जयंत पाटलांना अक्षरशः रडू कोसळलं.