मुंबई : महिलांना वजायनल डिस्चार्ज होणं सामान्य आहे. मात्र यावेळी डिस्चार्जचा रंग, गंध या गोष्टींवर शरीराच्या मासिक पाळीचं चक्र अवलंबून असतं. जर महिलांनी प्रेग्नेंसीच्या काळात स्वच्छेतेची योग्य काळजी घेतली नाही तर डिस्चार्जच्या गंधामध्ये बदल होऊ शकतो.
कधीकधी योनीमार्गातून होणारा डिस्चार्ज हे संसर्ग असल्याचा संकेत असू शकतो. जर डिस्चार्ज असामान्यपणे पिवळ्या किंवा हिरव्या रंगाचा असेल, चिकट असेल किंवा दुर्गंधी असेल तर ते इन्फेक्शनचं लक्षण असू शकतो.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, योनीमार्गात खाज येत असेल किंवा जळजळ जाणवत असेल तर हे यीस्ट संसर्ग किंवा बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे होऊ शकतं. जर तुम्हाला असामान्य दिसणारा किंवा दुर्गंधी असलेला कोणताही स्त्राव दिसला तर त्यावेळी सर्वप्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्या.
योनीमार्गाद्वारे होणारे डिस्चार्ज कोणत्या रंगाचे असू शकतात. जाणून घ्या
जर महिलांच्या योनीमार्गातून क्लियर डिस्चार्ज होत असेल तर हे ओव्यूलेशनच्या प्रक्रियेपूर्वी आणि गर्भावस्थेच्या दरम्यान असं होऊ शकतं.
अशा रंगाच्या डिस्चार्जला सामान्यपणे तीव्र गंध येतो. त्याचप्रमाणे असं असल्यास इन्फेक्शन होण्याचा धोका अधिक असतो.
जर तुम्ही आहारात काही बदल केला असेल तर पिवळा किंवा हिरवा डिस्चार्ज होण्याची शक्यता असते.
जर योनीमार्गातून ग्रे रंगाचा डिस्चार्ज होत असेल तर हे धोकादायक ठरू शकतं. त्याचप्रमाणे हे बॅक्टीरियल वेजिनोसिसचं कारणंही ठरू शकतं. अशावेळी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.