सावधान ! मॅट्रिमोनिअल साईटवरून फसवाफसवी

 मॅट्रिमोनिअल साईटवरून फसवाफसवीच्या (Fraud from matrimonial sites) घटनांत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.  

Updated: Jan 22, 2021, 10:53 AM IST
सावधान ! मॅट्रिमोनिअल साईटवरून फसवाफसवी

मुंबई : अनेक जण आपला विवाह जुळण्यासाठी मॅट्रिमोनिअल संकेस्थळांचा आधार घेतात. मात्र, तुम्ही योग्य ती खबरदारी घेतली नाही तर तुमची फसवणूक झालीच समजा. हे आम्ही सांगत आहोत, कारण मॅट्रिमोनिअल साईटवरून फसवाफसवीच्या (Fraud from matrimonial sites) घटनांत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तुम्ही वेळीच सावध व्हा.

मॅट्रिमोनिअल साईटवरून आमिष दाखवून होणाऱ्या विविध प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे. लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध बनवून फसवणूक करणे, आर्थिक फसवणूक करणे, मॅट्रिमोनियल साईटवरून संपर्क क्रमांक मिळवून बक्षिसांचे आमिष दाखवून फसवणूक करणे आदी गुन्ह्यांची नोंद आढळून येत आहे.

आकडेवारीनुसार गेल्या दोन वर्षात राज्यात 1216 विवाहेच्छूक महिलांशी संपर्क साधून त्यांची लाखो रूपयांना फसवणूक झाल्याचे गुन्हे दाखल झालेत.  याच दोन वर्षांत राज्यात एकूण 348 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यात काही नायजेरियन नागरिकांचाही समावेश आहे. ही आकडेवारी वरवरची असल्याचं दिसून येतंय. बदनामीच्या भीतीने 90 टक्के प्रकरणे पोलिस ठाण्यात नाहीत हे वास्तव आहे, असे पोलीस सांगतात.