केस गळती थांबवणारा, एक घरगुती सर्वोत्तम उपाय

केस निरोगी ठेवण्यासाठी हा नैसर्गिक आणि सर्वोत्तम उपाय आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 25, 2018, 12:33 PM IST
केस गळती थांबवणारा, एक घरगुती सर्वोत्तम उपाय title=

मुंबई : तुमचे केस गळत असतील, कोंडा होत असेल, डोक्याला खाज येत असेल तर एक घरगुती सर्वोत्तम उपाय आहे, तो करा, तुम्हाला एक नॅचरल हेअर कंडीशनर मिळाल्याची अनुभूती होईल.

एक नैसर्गिक सर्वोत्तम उपाय

एकतर हे मिश्रण अतिशय नैसर्गिक आहे, यामुळे यात कोणतंही हानीकारक केमिकल नाही, यामुळे तुमचे केस निरोगी होणार आहेत. केस गळणं मोठ्या प्रमाणात थांबणार आहे. फक्त एकदा करून थांबू नका, शॅम्पूला बाय बाय करा, आणि नेहमी हा उपाय करा, यासाठी जास्त वेळ लागणार नाही.

या तीन गोष्टींना पाण्यात भिजवा

सुकलेला आवळा - बाजारात सुकलेला आवळा मिळतो, तो पाण्यात आदल्या रात्री भिजवा, आवळ्यात मोठ्या प्रमाणात व्हिटामीन असतात, जे केस निरोगी करतात.

रिठा- रिठा तुम्हाला बाजारात सहज मिळतो, रिठा देखील केस मजबूत करतो. केस विकार दूर करतो.

शिकेकाई - शिकेकाई हा पदार्थ बाजारात सहज मिळतो, शिकेकाई हा केस निरोगी करण्यात महत्वाची भूमिका पार पाडतो.

आवळा, रिठा आणि शिकेकाई आदल्या रात्री एका पात्रात भिजवा. यात आवळा २० टक्के असेल, तर रिठा ३० ते ३५ टक्के घ्या, शिकेकाईचं प्रमाण ७० टक्के असावं. 

रात्री एका भांड्यात ते भिजवत ठेवा. सकाळी पाण्यात या तीनही पदार्थांचे गुण उतरले असतील, त्याला गरम करा, कोमट केल्यानंतर त्याने केस धुवा, नियमित केस धुताना हे वापरलं तर तुमचे केस दीर्घकाळ निरोगी राहण्यास मदत होईल.