माटुंग्याचं साऊथ इंडियन पदार्थांसाठी लोकप्रिय रामाश्रय

कधी या ठिकाणी गेलात तर खाण्याचा आस्वाद नक्की घ्या, असे हे ठिकाण आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 13, 2017, 04:30 PM IST

मुंबई : माटुंग्यात साऊथ इंडियन पदार्थांसाठी रामाश्रय अधिक लोकप्रिय आहे, रामाश्रय मधील मसाला डोसा, फिल्टर कॉफी, इडली, उत्तपा, उपमा हे सर्वच पदार्थ अतिशय रूचकर आहेत, त्यामुळे रामाश्रयची सर्वांकडून वाह वा होत असते. 

रामाश्रयमध्ये सकाळी सकाळी नाश्ता करणाऱ्यांची गर्दी असते. मात्र येथील सेवा खूप झटपट असल्याने उत्साहाचं वातावरण असते. माटुंगाकरांमध्ये हे खाण्याचं ठिकाण अतिशय लोकप्रिय आहे, कधी या ठिकाणी गेलात तर खाण्याचा आस्वाद नक्की घ्या, असे हे ठिकाण आहे.