close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

ओला टॅक्सी चालकाने तरुणीची छेड काढत कपडे उतरवले आणि काढले फोटो

एका तरुणीला मुंबईत जाण्यासाठी विमान पकडायचे होते. त्यासाठी तिला बंगळुरुतून विमानतळावर जायचे होते. त्यासाठी तिने ओला टॅक्सी बुक केली. मात्र, चालकाने दुसऱ्या मार्गाने कार घेतली. हा रस्ता जवळ असून लवकर पोहचू असे सांगितले.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 5, 2018, 08:40 PM IST
ओला टॅक्सी चालकाने तरुणीची छेड काढत कपडे उतरवले आणि काढले फोटो

बंगळुरु : एका २६ वर्षीय तरुणीने ओला टॅक्सी बुक केली होती. मात्र, चालकाने या तरुणीची छेड काढल्याची घटना पुढे आलेय. चालकाने या तरुणीला गाडीत डांबून ठेवले आणि तिची छेडछाड काढली. त्यानंतर तिचे कपडे उतरविले आणि फोटो काढले. दरम्यान, तरुणीला विमानतळावर लवकर पोहोचायचे होते. त्यासाठी तिने कार बुक केली. मात्र, चालकाने दुसऱ्या मार्गाने कार घेतली. हा रस्ता जवळ असून लवकर पोहचू असे सांगितले आणि तिला धोका दिला.

ही घटना शुक्रवारी १ जून रोजी रात्री घडली. मुंबईत जाण्यासाठी या तरुणींने ओला कार बुक केली. मात्र, चालकाने दुसऱ्याच मार्गाने टॅक्सी घेतली. हा रस्ता जवळचा आहे. येथून आपण लवकर पोहोचू असे सांगतिले. त्यानंतर निर्जनस्थळी कार पार्क केली. या तरुणीला गाडीत बंदीस्त केले. त्यानंतर तरुणीला चालकाने धमकावले. तू  जर ओरडाओरडा केलास तर मी माझ्या मित्रांना बोलावून घेईन आणि सामूहिक रेप करु. त्यानंतर तरुणीची छेड काढली. तिला कपडे काढायला भाग पाडले. तिचे फोटो काढून ते सोशल मीडियावर शेअर केले.

बेंगलुरु: ओला कैब ड्राइवर ने महिला के साथ की छेड़छाड़, कपड़े उतरवा कर खींची फोटो

त्यानंतर या तरुणीने गयावया केल्यानंतर कार चालकाने तिला विमानतळाच्या जवळ सोडले. त्यानंतर या तरुणीने एक मेल करुन याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी त्यानंतर तक्रार दाखल करुन घेतली. त्यानंतर पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीनंतर कार चालकाला अटक केली.

बंगळुरु पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, महिलेच्या तक्रारीनंतर आम्ही गुन्हा दाखल केलाय. त्यानंतर कार चालकाला अटक केली, असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त (इस्ट) सीमंत कुमार सिंग यांनी दिली. आम्ही ओला नोटीस बजावली आहे.