ब्रेस्टफीड करताना का येते स्तनांना खाज? जाणून घ्या कारणं

स्तनपानादरम्यान स्तनांना खाज येणं हे देखील बाळाला देखील त्रास होऊ शकतो. यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी बोलणं आवश्यक आहे. 

Updated: Mar 14, 2022, 02:44 PM IST
ब्रेस्टफीड करताना का येते स्तनांना खाज? जाणून घ्या कारणं title=

मुंबई : नवमातांना आई बनल्यानंतर अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशीच एक समस्या म्हणजे स्तनपान करताना स्तनांना खाज येणं. काहीवेळा महिलांना बाळाला स्तनपान देताना निप्पल्सला खाज येण्याची तक्रार, त्यामुळे बाळाला दूध पाजण्यासही त्रास होतो. बर्‍याच प्रकरणांमध्ये हे सामान्य असू शकतं. परंतु जर दीर्घकाळ हा त्रास होत असेल तर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू नये.

स्तनपानादरम्यान स्तनांना खाज येणं हे देखील बाळाला देखील त्रास होऊ शकतो. यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी बोलणं आवश्यक आहे. मात्र यामागे नेमकी कारणं काय आहेत हे जाणून घेतलं पाहिजे.

स्तनपानादरम्यान स्तनांना का येते खाज

स्किन इन्फेक्शन

स्तनपान देताना काही वेळा स्किन इन्फेक्शन, जळजळ आणि खाज येऊ शकते. सर्वात सामान्य फंगल इन्फेक्शन म्हणजे दाद आणि खाज सुटणं. यामध्ये तुमच्या शरीरावर गोलाकार रॅशेस तयार होतात. सर्वात सामान्य फंगल इन्फेक्शन दाद आणि खरुज हे आहेत.

एक्झिमा

एक्झिमा ही एक त्वचेची स्थिती आहे ज्यामुळे स्तनाच्या भागात खाज सुटणं, सूज येणं आणि लालसरपणा येऊ शकतो. याचा परिणाम ब्रेस्ट आणि निप्पलच्या त्वचेवर होऊ शकतो. बाळाला वारंवार स्तनपान दिल्यामुळे ही समस्या उद्भवू शकते. या काळात तुमची त्वचा कोरडी आणि संवेदनशील होऊ शकते. 

मॅस्टिटीस

मॅस्टिटीस हे बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे. यावेळी स्तनाच्या भागात सूज आणि वेदना आहे. हे बॅक्टेरिया निप्पलमधून तुमच्या शरीरात प्रवेश करू शकतात आणि दुधाच्या नलिकांवर परिणाम करू शकतात. यामुळे तुमच्या स्तनांमध्ये सूज, वेदना आणि लालसरपणा येऊ शकतो.