15 year boy breaks house in anger viral video: आजच्या जगात लहान मुलांना मोबाईलचं व्यसन आहे (Mobile Addiction in Children) यात काहीच नवीन नाही परंतु या व्यसनामुळे मुलांच्यात शारिरिक आणि मानसिक बदल झाले आहेत. अनेकदा मोबाईलच्या अती व्यसनामुळे मुलांमध्ये चिडचिड आणि रागीटपणा वाढला आहे आणि त्याचे परिणाम आज पालकांना भोगायला लागत आहेत.
लहान किंवा किशोरवयीन मुलंच नाही तर जो कोणी पाहतो तो तासन्तास मोबाईलमध्ये मग्न असतो. मोबाईलचे फायदे तर आहेतच पण त्याचबरोबर तोटेही आहेत म्हणूनच मुलांना मोबाईलचे व्यसन लागू नये हे महत्त्वाचे आहे. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जो पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. (Pros and cons of Mobile)
एका 15 वर्षीय मुलाच्या आईनं त्याच्याकडून मोबाईल काढून घेतला म्हणून त्यानं घरात चक्क तोडफोड केली. तोडफोडीनंतर झालेली घराची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. त्यातून या मुलानं किचनपासून ते चक्क बेडरूम आणि हॉलमधील सगळ्याच वस्तूंची तोडफोड केली आहे.
व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की स्वयंपाकघरात सर्व वस्तू इकडे तिकडे विखुरलेल्या आहेत. मुलाने केवळ सामानच फोडले नाही, तर बेडरूममधील कपाटाची काचही फोडली आहे. याशिवाय त्याने हॉलमधील खिडकीच्या काचा फोडल्या आहेत. बाथरूममध्येही अनेक गोष्टी फोडल्या आहेत. तसेच खोलीतील टीव्हीही खाली पाडून फोडला आहे. या गृहस्थांचे एकूण हजारो रूपयांचे नुकसान झाले आहे.
हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. (viral video on twitter)
घर पर ये तबाही 15 वर्षीय बच्चे ने मचाई क्योंकि उसकी माँ ने उसका मोबाइल फ़ोन ले लिया था. दृश्य देखकर स्पष्ट है कि माता-पिता के लिए आज की पीढ़ी को मोबाइल अडिक्शन से बचने एवं इमोशंस + एक्शन्स पर नियंत्रण रखने की सीख, परवरिश में देना कितना जरूरी है. pic.twitter.com/dAcFareSX7
— Dipanshu Kabra (@ipskabra) September 16, 2022
हा व्हिडीओपाहून नक्कीच तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. मुख्य म्हणजे हा व्हिडीओ आपल्या सगळ्यांसाठी डोळ्यात अंजन घालणारा आहे. या व्यसनाचे बळी केवळ लहान मुलेच नाहीत तर तरुणांपासून ते वृद्धांपर्यंतही आहेत. त्यामुळे विशेषतः लहान आणि किशोरवयीन मुलांचे मोबाईलचे व्यसन आपण सोडलं नाहीत तर त्याचं घातक परिणाम नक्कीच होऊ शकतात.