पाकिस्तानलाही कोरोनाचा फटका, २३० सैनिक आयसोलेशनमध्ये

कोरानमुळे पाकिस्तानमध्ये आतापर्यंत ७ हून अधिक लोकांचा मृत्यू 

Updated: Mar 27, 2020, 08:06 AM IST
पाकिस्तानलाही कोरोनाचा फटका,  २३० सैनिक आयसोलेशनमध्ये title=

मुंबई : चीनच्या वुहानमध्ये सुरूवात झालेल्या कोरोनाने आपलं जाळ पसरवायला कधीच सुरूवात केली. कोरोनामुळे जगभरात २२ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. असं असताना आता पाकिस्तान देखील कोरोनाच्या जाळ्यात अडकलं आहे. पाकिस्तानमध्ये कोरोना विषाणूचं संक्रमण होताना दिसत आहे. पाकिस्तानी लष्करातही कोरोनाने शिरकाव केल्याचं उघड झालं आहे. 

पाकिस्तानने २३० सैनिकांना कोरोनाच्या संशयामुळे आयसोलेशनमध्ये पाठवलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे या सैनिकांमधील ४० जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. विशेष म्हणजे यात पाकिस्तानी लष्कराच्या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. 

सुत्रांच्या माहितीनुसार गिलगित-बाल्टिस्तानमध्ये २८, डोमेलमध्ये ४१, बागमध्ये ९, रावलाकोटमध्ये १४, मीरपुरमध्ये ४५ आणि खैबर पख्तुनख्वामध्ये ५५ पाकिस्तानी सैनिकांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. तिथेच मुजफ्फराबादमध्ये २१, रावलाकोटमध्ये ९, कोटलीमध्ये २, बलोचिस्तानमध्ये ८ आणि खैबर पख्तुनख्वा- पंजाबमध्ये एक-एक सैनिकांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे. 

पाकिस्तानचे क्वारंटाइन सेंटर पीओके आणि गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये स्थापित करण्यात आले आहे. यामुळे पाकिस्तानच्या मुख्य शहरात म्हणजे पंजाबमध्ये व्हायरस पसरण्याचा धोका मोठा आहे.