Man give birth to daughter : निसर्गाने स्त्री आणि पुरूष अशा दोन व्यक्तीरेखा तयार केल्या. कोणत्याही व्यवस्थेत स्त्रियांचं महत्व जास्त असतं. त्याचं कारण म्हणजे स्त्रियांमध्ये नवीन उत्पत्ती निर्माण करण्याची क्षमता असते. माणसाच्या जडणघडणीत पुरुषाचंही मोठे योगदान आहे. पण तो जन्म देऊ शकत नाही, असं म्हणतात. मात्र, आता समोर आलेल्या एका उदाहरणामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. निसर्गाच्या प्रस्थापित नियमांच्या विरुद्ध जाऊन अमेरिकेत एका पुरूषाने चक्क एका मुलीला जन्म दिल्याची घटना समोर आली होती. वैज्ञानिकदृष्ट्या हे कसं काय शक्य झालं? पाहुया...
अमेरिकेच्या वेस्ट व्हर्जिनियामध्ये 2020 मध्ये एक हादरवणारी घटना समोर आली होती. व्हर्जिनियामध्ये राहणाऱ्या 28 वर्षीय अॅश पॅट्रिक शेडने मुलाला जन्म दिला होता. असं झालं तरी कसं? असा सवाल विचारला जात होता. झालं असं की... अॅश जन्मापासून एक मुलगी होता. त्याला पुरूष व्हायची इच्छा होती. त्यामुळे त्याने 2020 मध्ये पुरुष बनण्याची प्रक्रिया सुरू केली होती. त्याने टेस्टोस्टेरॉन घेणं सुरू केलं. त्याचबरोबर तो इस्ट्रोजेन ब्लॉकर देखील घेणं सुरू केलं होतं. काळी वेळाने त्याला आपण पुरूष असल्याची जाणीव होऊ लागली. सगळं काही ठिकठाक चाललं होतं. मात्र, फेब्रुवारीमध्ये त्याला समजलं की तो प्रेग्नेंट आहे.
आपल्या प्रेग्नेंसीबद्दल समजल्यानंतर त्याला आश्चर्याचा धक्का बसला. तो स्वत: पीएचडी स्टुडंट असल्याने त्याने पाठपुरावा सुरू केला. अॅशची एका डेटिंग अॅपवर एका व्यक्तीशी ओळख झाली होती. त्यावेळी दोघांनी एक रात्र सोबत काढली होती. त्यामुळे अॅश प्रेग्नेंट झाला होता. त्याला वाटलं की मुलीमधून त्याचं ट्रॅझिशन पूर्ण झालंय. मात्र, त्याचवेळी प्रेग्नेंसीची न्यूज आली. त्यानंतर त्याने हॉर्मोन ट्रीटमेंट बंद केली अन् एका मुलीला जन्म दिला. रोनन असं मुलीचं नाव देखील त्याने ठेवलं आहे.
अॅश आपल्या लिंगाबद्दल बऱ्याच दिवसांपासून गोंधळात होता. त्याला काय बनायचं आहे हे ठरवता येत नव्हतं. जेव्हा त्याने गर्भधारणेबद्दल समजलं तेव्हा ठरवलं की ती मुलाला जन्म देईल. त्याची प्रक्रिया पूर्ण न झाली नव्हती, याच काळात शारिरीक संबंध ठेवल्याने असं झालं असावं, असं डॉक्टरांनी सांगितलं होतं.