35 वर्षीय सुंदर बिटकॉइन किलरने 90 हजार कोटींना घातला गंडा, जगातील एजन्सी या महिलेच्या शोधात

 2016 मध्ये बिटकॉइनची (Bitcoin) चमक फीकी पडू लागली. कारण...

Updated: May 15, 2021, 07:38 AM IST
35 वर्षीय सुंदर बिटकॉइन किलरने 90 हजार कोटींना घातला गंडा, जगातील एजन्सी या महिलेच्या शोधात

मुंबईः 2016 मध्ये बिटकॉइनची (Bitcoin) चमक फीकी पडू लागली. कारण, दोन वर्षांपूर्वी बाजार आलेले वनकॉइन चलन. (One Coin) हे क्रिप्टो चलन बल्गेरियातील एका कंपनीने आणले होते. या कंपनीची मालकिन रुजा इग्नाटोवा होती. जी खूपच सुंदर होती आणि स्वतः या क्रिप्टो चलनाची (Crypto currency) ब्रँड अ‍ॅम्बेसेडर देखील होती.

रुजा इग्नाटोवा जगभर फिरुन सांगितले की, वनकॉइन (One Coin) हे भविष्यातील चलन आहे. त्यात गुंतवणूक करणे खूपच सुरक्षित आहे आणि हेच चलन देखील सर्वात जास्त फायदा देते. इतकेच नाही तर रुजाने वनकॉइनला बिटकॉइन किलर म्हणून संबोधले. बाजारही तेच संकेत देत होता. वनकॉइन चलनाची किंमती सातत्याने वाढत होती आणि लोक त्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करीत होते.

The great game of Onecoin-4

आणखी काही सांगण्यापूर्वी रुजाबद्दल सांगणे महत्वाचे आहे. रुजा इग्नाटोव्हाने  (Ruja Ignatova)ऑक्सफोर्ड विद्यापीठात शिक्षण घेतले आणि जर्मनीतील विद्यापीठातून पीएचडी केली. तिने सांगितले की पीएचडीनंतर आपण मॅकेन्झी अँड कंपनीबरोबर काम केले. ही कंपनी जगातील नामांकित व्यवसाय सल्लागार कंपनी आहे.

The great game of Onecoin-3

रुजाने अवघ्या तीन वर्षात (2014-2016)  जगभरातून सुमारे 12 अब्ज डॉलर्स जमा केले. ती जगभरात क्रिप्टो चलन राणी म्हणून ओळखली जात होती. बिग मीडिया हाऊसेसने तिच्या यशावर कव्हर स्टोरीज करण्यास सुरुवात केली आणि त्यावेळी नवीन 2017 हे वर्ष आले.

The great game of Onecoin-2

 2017 मध्ये रूजाने सांगितले की, ती एक नवीन योजना आणत आहे. मग ती गायब झाली. जगभरातील गुंतवणूकदार उद्ध्वस्त झाले. एफबीआय आणि एमआय 5 सारख्या एजन्सी तिचा आता शोध घेत आहेत. असे मानले जाते की तिने आपली प्लास्टिक सर्जरी केली आणि चेहरा बदलला. सध्या ती 41 वर्षांची झालेली असेल, परंतु गेल्या चार वर्षांपासून कोणीही तिला पाहिलेले नाही. अशाप्रकारे रुजाने अवघ्या तीन वर्षात 90  हजार कोटींपेक्षा जास्त पैसे कमावले होते आणि ती अचानक गायब झाली. वनकॉइनचे गूढ सोडविण्यात जगातील एजन्सी अपयशी ठरल्या आहेत.