7 Foot Flying Aliens: लॅटिन अमेरिकेतील पेरू देश सध्या चर्चेत आहेत. या चर्चामागील कारण म्हणजे एलियन्स. येथील एका गावातील लोकांनी मागील आठवड्यामध्ये आम्हाला हवेत उडणारे 7 फूट उंचीचे एलियन्स दिसल्याचा दावा केला आहे. त्यांनी आमच्यावर हल्ला केल्याचा दावाही गावकऱ्यांनी केला आहे. मात्र पेरूमधील सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातील लोक त्यांना पेलाकारा (चेहरा खाऊन टाकणारे एलियन्स) समजत आहेत ते मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील वेगवेगळ्या भागांमध्ये बेकायदेशीपणे सोन्याचं उत्खनन करणाऱ्या टोळीतील लोक असावीत.
पेरुमधील गावकऱ्यांनी हल्ला करणाऱ्यांबद्दल माहिती देताना, त्यांची डोकी फार मोठी होती. त्यांच्या त्वेचेचा रंग चंदेरी होता, असं म्हटलं आहे. 'दे डेली मेल'ने दिलेल्या वृत्तानुसार, स्थानिक गावकऱ्यांच्या इकितू नावाच्या टोळीच्या दावाप्रमाणे 11 जुलैपासून या एलियन्सने गावावर चाल करण्यास सुरुवात केली. डोक्यावर काळ्या रंगाची हूडसारखी टोपी घातलेल्या 7 फूट उंचीच्या या मनुष्यसदृष्य प्राण्यांनी आमच्यावर हल्ला केल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.
पेरुमधील कायदा-सुव्यवस्थेसंदर्भातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेकायदेशीर खाण उत्खनन करणाऱ्यांनी 29 जुलै रोजी एका 15 वर्षीय मुलीचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला. या अपहरणाच्या प्रयत्नादरम्यान त्यांनी या तरुणीचा गळा चिरला. याचबरोबर या मुलीच्या शरीरावर अन्य ठिकाणी जखमाही आढळून आल्या. यानंतर अन्य एका व्यक्तीनेही एलियन्सने आमच्यावर हल्ला केल्याचा दावा अन्य गावकऱ्यांनी केला.
इतिकु समुहाचे नेते एलिवा यांनी 'द डेली मेल'ला दिलेल्या माहितीनुसार, "एलियन्स स्पायडर-मॅनसारखे दिसतात. त्यांची डोकी लांबलचक आहेत. चेहरा उभट आणि डोळे अर्धवट पिवळे होते. यामुळेच ते आम्हाला पाहून अंधारात निघून जायचे," असा दावा केला आहे. अधिकाऱ्यांनी केलेल्या दाव्यानुसार 7 फुटांचे एलियन्स हे ब्राझीलमधील प्राइमिरो कमांडो दा कॅपिटल कोलंबियाच्या 'क्लान डेल गोल्फो' एफएआरसीसारख्या टोळीचे सदस्य असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. अंमली पदार्थाच्या तस्करीशी संबंधित टोळ्यांकडून सोन्याची तस्करी करण्यासाठी लोकांना घाबरवत असल्याचा दावा केला जात आहे. लोकांनी एलियन्सच्या भितीने घरात स्वत:ला कोंडून घ्यावं आणि आपल्याला तस्करी करता यावी असा या मागील हेतू असू शकतो असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मात्र अशाप्रकारे एलियन्स दिसल्याची काही पहिलाच दावा करण्यात आलेला नाही. यापूर्वीही अनेकदा येथील लोकांनी अशाप्रकारे परग्रहावरील प्राण्यांनी हल्ला केल्याचे दावे केले आहेत.