नवी दिल्ली : 'ये दोस्ती...हम नही तोडेंगे...' प्रत्येकाच्या आयुष्यात मित्रांसाठी एक खास जागा असते. आयुष्यातील अनेक चांगल्या वाईट समयी एका आवाजात कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता धावून येतो ते म्हणजे खास मित्र. जीवनाच्या प्रत्येक वाटेवर ओळखी होतात. कालांतराने ओळखीचे रूपांतर मैत्रीत देखील होते. पण ज्या व्यक्ती मनात खास जागा असते ती जागा नवा मित्र कधीच घेवू शकत नाही. अमेरिकेत अशाचं एका मित्रानं आपल्या खास मित्रासोबत लॉटरी जिंकल्यानंतर मिळाली रक्कम अर्धी वाटून घेतली आहे.
टॉम कूक आणि जो फॅनी हे दोघे एकमेकांचे अतिशय चांगले मित्र आहेत. जवळपास गेल्या २८ वर्षांपासून टॉम कूक आणि जो फॅनी लॉटरीची तिकीटं काढत होते, मात्र दोघांनाही लॉट्री काही लागत नव्हती. त्यानंतर त्यांनी २० वर्षांपूर्वी कोणालाही लॉटरीचं तिकीट लागलं तर मिळालेली रक्कम अर्धी अर्धी वाटून घेण्याचं या दोघांनी ठरवलं होतं.
अखेर तब्बल २० वर्षांच्या प्रयत्नांनंतर जुलै महिन्यामध्ये टॉम कूक याला १६५ कोटींची लॉट्री लागली. त्यानंतर त्याने ही बाब त्याचा खास मित्र जो फॅनीला कळवली. आता लॉट्रीमध्ये मिळालेली रक्कम अर्धी अर्धी वाटून घेऊ असं त्याने सांगितलं. यासंदर्भातील वृत्त ‘द गार्डियन’ने दिलं आहे.