इस्लामाबाद : मीम्समधून भारतात कायम चर्चेत असणारे पाकिस्तानचे टीव्ही होस्ट आणि खासदार डॉ. आमिर लियाकत यांचे गुरूवारी निधन झाल्याची घटना घडली होती. त्यांच्या या निधनाच्या तीन दिवसानंतरही मृत्यूवरून पाकिस्तानात मोठा वाद सूरू आहे. दरम्यान या प्रकरणात नेमका वाद काय सुरु आहे तो जाणून घेऊयात...
खासदार आमिर लियाकत हुसैन टीव्ही होस्ट म्हणून प्रसिद्ध होतेच परंतु सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओ आणि मीम्समुळे ते नेहमीच चर्चेत असायचे. मीम्समुळे भारतात खासकरून ते खुप प्रसिद्ध होते. लियाकत यांच्या निधनावरून आता पाकिस्तानात आता वाद सुरु झालाय. पाकिस्तानचा प्रसिद्ध अभिनेता फिरोज खानने त्यांच्या मृत्यूवरून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
पत्नीवर गंभीर आरोप
फिरोज खान याने लियाकत यांच्या मृत्यूनंतर पत्नी दानिया मलिकवर गंभीर आरोप केले आहेत. फिरोजने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर आमिर आणि दानियाचा एक फोटो शेअर केला ज्यामध्ये अभिनेत्याने लिहिले की, 'आमिर लियाकतला कोणी मारले...? त्या डिप्रेशनने...त्याची पत्नी दानिया मलिकने त्याचा न्युड व्हिडिओ बनवून लिक केल्यावर घडले. ही घटना दोघेही कायद्याने पती-पत्नी असताना घडली असल्याचे त्याने पोस्टमध्ये म्हटलेय.
तो पुढे लिहतो की, आमिरनेही दानियासोबत असेच काही केले असते, तर आतापर्यंत महिलांचा मोर्चा दानियाचे फलक घेऊन रस्त्यावर उतरला असता.
दानियाचा घटस्फोटासाठी अर्ज
काहि दिवसांपूर्वी आमिरचा न्यूड व्हिडिओ सोशल मीडियावर लीक झाला होता आणि तोही आईस ड्रग्स घेताना. आमिरने त्याचा राग तिसऱ्या पत्नीवर काढला होता असा खुलासा दानिया यांनी केला. त्याचवेळी लग्नाच्या तीन महिन्यांनंतर दानियाने आमिरपासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. दानियाने खुलासा केला की आमिर कोणत्याही सैतानपेक्षा वाईट आहे
आमिरचे तिसरे लग्न त्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या लग्नापेक्षा जास्त चर्चेत आले. तिसरे लग्न केवळ 3 महिने टिकले आणि दानियाने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दानियाने आरोप केला होता की, आमिर तिच्या मित्रांसोबत अॅडल्ट व्हिडिओ बनवण्यासाठी जबरदस्ती करत असे.