Strange Traditions of Tribal People: जगात अनेक आदिवासी जमाती आढळतात. या आदिवासी जमातींमध्ये अनेक रुढी परंपरा आहे. त्यापैकी काही परपंरा आश्चर्यकारक आहेत. आधुनिक जगात लोक आपल्या परंपरा, चालीरीती विसरले आहेत, तर दुसरीकडे आजही आदिवासी लोक आपल्या परंपरा आणि चालीरीतींचे पालन करताना दिसत आहेत. अशीच एक आदिवासी जमात आफ्रिका खंडात आढळते. ज्याच्या चालीरीती तुम्हाला आश्चर्याचा धक्का देतील.
परंपरा
आफ्रिकेतील नामिबियामध्ये राहणारी हिम्बा जमात अतिशय अनोखी आहे. कारण इथल्या लोकांमध्ये मुलाच्या जन्माबाबत खूप रंजक रुढी आहेत. या जमातीतील मूल या जगात कधी जन्माला येईल याचा विचार केला जात नाही, परंतु जेव्हा स्त्रीला वाटते की ती मुलाला जन्म देईल, तेव्हापासून मुलाच्या जन्माचा विचार केला जातो.
मिळालेल्या माहितीनुसार, महिला एका झाडाखाली बसून मुलाशी संबंधित गाणे ऐकण्याचा प्रयत्न करते. जेव्हा तिला गाण्याची सूचना मिळते तेव्हा ती तिच्या जोडीदारालाही गाणे सांगते. रिलेशनशिप असतानाही दोघेही हे गाणे गातात. स्त्री गरोदर राहिल्यावर ती ते गाणे जमातीतील इतर स्त्रियांना शिकवते. मग गरोदरपणात सगळे तिला घेरतात आणि ते गाणे तिला सांगतात. मुलाच्या जन्मापासून ते मोठे होईपर्यंत गावातील प्रत्येक व्यक्तीला मुलासाठीचे गाणं स्मरणात राहतं. हे गाणे माणसाच्या शेवटच्या श्वासापर्यंत ऐकवलं जाते.
स्त्रिया आयुष्यात एकदाच आंघोळ करतात
तुम्ही विचार करत असाल की आयुष्यात एकदाच आंघोळ कशी होऊ शकते? पण हे खरं आहे. हिंबा जमातीच्या स्त्रिया आयुष्यात एकदाच आंघोळ करतात, तीही लग्नाच्या दिवशी. याशिवाय त्या कपडे धुण्यासाठी पाणीही वापरू शकत नाही. स्वत:ला स्वच्छ ठेवण्यासाठी या जमातीतील महिला विशेष औषधी वनस्पती पाण्यात उकळतात आणि त्याच्या वाफेने स्वत:ला स्वच्छ करतात. त्यामुळे शरीरातून दुर्गंधी येत नाही. याशिवाय उन्हापासून त्वचेचे रक्षण करण्यासाठी महिला प्राण्यांच्या चरबीपासून आणि लोह, हेमॅटाइट यासारख्या खनिज घटकांपासून खास लोशन बनवून शरीरावर लावतात.