खासदाराचा 31 वर्ष लहान पत्नीसोबतचा खासगी व्हिडीओ व्हायरल

खासदाराने आपल्यापेक्षा 31 वर्षीय लहान तरुणीशी लग्न केल्याची चर्चा जगभरात होती. आता त्यांचा एक खासगी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Updated: Feb 16, 2022, 06:51 PM IST
खासदाराचा 31 वर्ष लहान पत्नीसोबतचा खासगी व्हिडीओ व्हायरल title=

नवी दिल्ली: खासदाराने आपल्यापेक्षा 31 वर्षीय लहान तरुणीशी लग्न केल्याची चर्चा जगभरात होती. आता त्यांचा एक खासगी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे चांगलीच खळबळ देखील उडाली आहे. खासदाराचा असा व्हिडीओ सोशल मीडियावर आल्याने अनेकांनी भुवया उंच केल्या आहेत. 

पाकिस्तानचे खासदार आमिर लियाकत हुसैन यांनी आपली नवीन पत्नी सैयदा दानिया शाहसोबतचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. सैयदा दानिया शाह सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. तिने तिच्या चाहत्यांसोबतच काही खासगी व्हिडीओ देखील शेअर केले आहेत. 

खासदार आमिर आणि त्यांच्या पत्नीचे रोमँटिक व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर युजर्सनी देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी या व्हिडीओला लाईक केलं आहे तर काहींनी संतापही व्यक्त केला आहे. 

या व्हिडीओमध्ये खासदार आमिर आणि त्याची पत्नी खूप जास्त खूश दिसत आहे. काही लोकांनी या व्हिडीओवर नाराजी व्यक्त केली आहे. या हा व्हिडीओ शेअर करताना लव्ह यू मेरी जान असं कॅप्शन दिलं आहे.