कार अपघातात या देशाच्या पंतप्रधानांचं निधन

 गाडीचा चालक आणि सुरक्षा रक्षक जखमी 

Updated: Sep 9, 2018, 12:40 PM IST
कार अपघातात या देशाच्या पंतप्रधानांचं निधन

मॉस्को : अबखाजियाच्या पंतप्रधानांच्या गाडीला शनिवार उशिरा रात्री अपघात झाल्याने या अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक सरकार अबखाजिया कॅबिनेटच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार 70 वर्षीय गेनेडी गगुलिया यांचं दक्षिण रशियामध्ये एका दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.

रशियातील एका वृत्तसंस्थेने दिलेल्या3 माहितीनुसार, गगुलिया सीरियामध्ये एका शिष्टमंडळासोबत परत येत असतांना ही दुर्घटना झाली. सरकारी प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडीचा चालक आणि सुरक्षा रक्षक या अपघातात जखमी झाले आहे. अबखाजियामध्ये राष्ट्रपती रउल खजिम्बा हे राष्ट्राचे प्रमुख आहेत.

Gennady Gagulia