नवी दिल्ली : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्यावर एका अभिनेत्रीने गंभीर आरोप केला आहे.
हॉलिवूड अभिनेत्री हीदर लिंड हिने जॉर्ज बुश यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप केला आहे. एका सिनेमाच्या स्क्रिनिंग दरम्यान जॉर्ज बुश यांनी चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला असा आरोप अभिनेत्री हीदर लिंड हिने केला आहे.
'एनव्हायडेलीन्यूज डॉट कॉम'च्या वृत्तानुसार, अभिनेत्री हीदर लिंडने मंगळवारी एक इंस्टाग्राम पोस्ट करत आपल्या आरोपांसंदर्भात सविस्तर लिहीलं आहे. एका सिनेमाच्या स्क्रिनिंग दरम्यान जॉर्ज बुश यांनी चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. व्हिलचेअरवर बसलेल्या बुश यांनी केलेला स्पर्श खूपच वाईट होता.
अभिनेत्री हीदर लिंडने लिहीलं आहे की, मी चार वर्षांपूर्वी एका ऐतिहासिक टीव्ही शोच्या प्रमोशन कार्यक्रमा दरम्यान जॉर्ज बुश यांना भेटली होती. त्यावेळी बुश यांनी माझ्यासोबत गैरवर्तन केलं.
अभिनेत्री हीदर लिंडने पूढे लिहीलं आहे की, त्यांनी माझ्यासोबत हस्तांदोलन केलं नाही. त्यांनी आपल्या व्हिलचेअरवरुन मला पाठीमागून स्पर्श केला. त्यावेळी बुश यांनी पत्नी बार्बरा बुश जवळच उभ्या होत्या. बार्बरा यांनी आपल्या नजरेने बुश यांना असे करण्यापासून रोखलं. बुश यांच्या सुरक्षारक्षकांनी सांगितलं की, मला त्यांच्याजवळ उभ रहायला नव्हतं पाहीजे.
आम्हाला सूचना दिल्या होत्या की, त्यांना राष्ट्राध्यक्ष असे संबोधित करा. मला त्यांच्यात एका राष्ट्राध्यक्षांची ताकद दिसली जी एक सकारात्मक बदल घडविण्याची क्षमता ठेवते. मात्र, माझा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन आता बदलला. कारण, त्यांनी त्यांच्याकडील शक्तीचा वापर माझ्याविरोधात केला. तसेच त्यांच्याबाबत मी इतरांकडूनही खूप काही ऐकलं.