अफगाणिस्तान तालिबानच्या घशात, राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी राजीनामा देणार?

 अफगाणिस्तानचा पाडाव करण्यासाठी तालिबानने संपूर्ण शक्ती पणाला लावलीय.  

Updated: Aug 14, 2021, 11:27 PM IST
 अफगाणिस्तान तालिबानच्या घशात, राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी राजीनामा देणार?  title=

काबूल :  अफगाणिस्तानातील अशरफ घनी सरकारचे अखेरचे काही तास उरलेत. राजधानी काबुलच्या वेशीवर तालिबानी पोहचले आहेत. त्यात आता तालिबान्यांनी भारताविरोधातही गरळ ओकण्याला सुरूवात केलीय. अफगाणिस्तानात नेमकं काय सुरू आहे त्यावरचा हा रिपोर्ट. (afganistan President Ashraf Ghani to likley be resign over to Taliban terror)
 
अफगाणिस्तानचा पाडाव करण्यासाठी तालिबानने संपूर्ण शक्ती पणाला लावलीय. अफगाणिस्तान धोक्यात असल्याचं स्वतः राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनीच कबुल केलंय. त्यामुळं लोकशाहीवादी गनी सरकारला अखेरची घरघर लागल्याचं स्पष्ट झालंय. राजधानी काबुल वाचवण्यासाठी निकराची लढाई सुरू आहे. कोणत्याही क्षणी गनी राजीनामा देतील आणि अफगाणिस्तान तालिबान्यांच्या ताब्यात जाईल, अशी चिन्हं आहेत.

अफगाणिस्तानातला रेडिओही आता तालिबानच्या ताब्यात आहे. कंदाहार जिंकल्यावर तालिबानने तातडीने रेडिओ स्टेशन ताब्यात घेऊन त्यावरून प्रचार आणि धमकी सत्र सुरू केलंय. या विजयामुळं अवसान आलेल्या तालिबानने तातडीने भारताविरोधात गरळ ओकायला सुरूवात केलीय. 

अफगाणिस्तानात भारत लष्करी कारवाई करणार असेल तर परिणाम भोगायला तयार राहा. अफगाणिस्तानात आलेल्या इतर देशांच्या फौजांची काय अवस्था केली, तुम्ही पाहिली आहेच. त्यामुळं भारतानं अफगाणिस्तानात हस्तक्षेप करू नये. भारताने इथे केलेल्या विकासकामांचं आम्हाला कौतुकच आहे. पण कारवाईच्या फंदात पडू नका, अशी धमकी तालिबानी प्रवक्यानं दिलीय. 

काबूलचा पाडाव करून कोणत्याही क्षणी तालिबान अफगाणिस्तावर कब्जा करेल, अशी परिस्थिती आहे. अफगाणिस्तानवरचा तालिबान्यांचा ताबा नजीकच्या भविष्यात भारतासाठीही डोकेदुखी ठरणाराय.