अफगाणिस्तानचे अध्यक्ष हेलिकॉप्टरमध्ये पैसे कोंबून-कोबून भरुन पळून गेले, जागेच्या अभावामुळे अनेक पिशव्या सोडून गेले

तालिबानने अफगाणिस्तानचा पाडाव केल्यानंतर परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. तालिबानने जश्न सुरु केला आहे. मात्र, तालिबानने एक एक शहर ताब्यात घेतल्यानंतर काबूलकडे कूच केली आणि...

Updated: Aug 17, 2021, 07:36 AM IST
अफगाणिस्तानचे अध्यक्ष हेलिकॉप्टरमध्ये पैसे कोंबून-कोबून भरुन पळून गेले, जागेच्या अभावामुळे अनेक पिशव्या सोडून गेले title=

मॉस्को : तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानचा (Afghanistan) पाडाव केल्यानंतर परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. तालिबानने जश्न सुरु केला आहे. मात्र, तालिबानने एक एक शहर ताब्यात घेतल्यानंतर काबूलकडे कूच केली. त्याआधीच अफगाणिस्तानचे अध्यक्ष (Afghan President) अशरफ गनी देश सोडून पळून गेले आहेत. (Ashraf Ghani Runs Away) त्यांनी त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये रोखड भरली. पैसे कोंबून कोंबून भरले. दरम्यान, जागेच्या अभावामुळे, नोटांनी भरलेल्या काही पिशव्या धावपट्टीवरच सोडून दिल्या. ही माहिती रशियाच्या अधिकृत माध्यमांनी दिली आहे.

अशरफ गनी यांनी पैसे काढून घेतले

तालिबानने काबूलवर कब्जा केल्याने, यूएस समर्थित अशरफ गनी सरकार रविवारी कोसळले आणि राष्ट्रपतींना देश सामान्य लोकांप्रमाणे देश सोडावा लागला. रशियाची सरकारी वृत्तसंस्था 'टास'ने याबाबतचे वृत्त दिले आहे. 72 वर्षीय राष्ट्रपती अशरफ गनी काबुलमधील रशियन दूतावासाचा हवाला देत रोख रकमेने भरलेल्या हेलिकॉप्टरने काबूलमधून पळून गेले.

दूतावासाच्या कर्मचाऱ्याच्या हवाल्याने बातमी दिली आहे, "सत्ता गमावल्यामुळे अशरफ गनी यांना अशा प्रकारे देश सोडून पळून जावे लागले आणि त्यांच्या चार कार रोख पैशांनी भरलेल्या होत्या." हेलिकॉप्टरमध्ये या सर्व गाड्यांमधून भरपूर पैसे भरण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण सर्व रोख रक्कम हेलिकॉप्टरमध्ये भरता आली नाही आणि त्यांना काही पैसे तिथेच धावपट्टीवर सोडावे लागले.

धावपट्टीवरच मोठी रक्कम सोडावी लागली

'तास'ने दूतावासाच्या कर्मचाऱ्याचे नाव घेतले नाही, परंतु रशियन वायर सर्व्हिस स्पुतनिकने रशियन दूतावासाच्या प्रवक्त्या निकिता इश्चेन्कोचा हवाला देत म्हटले की, गनी यांच्या काफिल्यामध्ये काबुलकडे पळून जाताना रोख रकानेच्या गाड्या होत्या. ईशेंको म्हणाले, 'त्यांनी सर्व पैसे हेलिकॉप्टरमध्ये भरण्याचा प्रयत्न केला पण जागेअभावी ते होऊ शकले नाही. धावपट्टीवर काही पैसे सोडून देण्यात आले होते.

अफगाणिस्तान सोडल्यानंतर आपल्या पहिल्या वक्तव्यात, गनी यांनी रविवारी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली. यामध्ये राष्ट्रपतींनी लिहिले, 'त्यांच्याकडे दोन कठीण पर्याय होते, पहिले सशस्त्र तालिबान राष्ट्रपती भवनात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि दुसरा, माझा प्रिय देश सोडण्याचा. ​​ज्याच्या संरक्षणासाठी मी माझ्या आयुष्याची 20 वर्षे घालवली.'

ते म्हणाले, “जर पुन्हा देशातील असंख्य नागरिक शहीद झाले आणि काबूलमध्ये विनाश झाला, तर सुमारे सहा दशलक्ष लोकसंख्या असलेल्या शहरासाठी, परिणाम अत्यंत घातक ठरला असता. तालिबान्यांनी मला काढण्याचा निर्णय घेतला होता, ते काबूल आणि काबूलच्या लोकांवर हल्ला करण्यासाठी येथे आले आहेत. अशा परिस्थितीत, भीषण विनाश टाळण्यासाठी, मला तिथून निघणे योग्य वाटले.

गनी यांनी देश सोडण्याचे सांगितले कारण 

शेजारच्या ताजिकिस्तानमध्ये आश्रय घेतलेले गनी म्हणाले, "तालिबानने शस्त्राच्या बळावर युद्ध जिंकले आहे आणि आता देशवासीयांच्या सन्मान, पैसा आणि स्वाभिमानाचे रक्षण करण्याची जबाबदारी त्यांची आहे." व्यवसायाने शिक्षणतज्ज्ञ आणि अर्थतज्ज्ञ, गनी अफगाणिस्तानचे 14 वे राष्ट्रपती होते. 20 सप्टेंबर 2014 रोजी पहिल्यांदा आणि 28 सप्टेंबर 2019 रोजी दुसऱ्यांदा ते अध्यक्षपदाच्या निवडणुका जिंकून या पदावर निवडून आले.

उल्लेखनीय म्हणजे, अफगाणिस्तानवर 1996 ते 2001पर्यंत तालिबानचे राज्य होते आणि 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेच्या नेतृत्वाखालील लष्करी दलांनी देशातून त्यांचे शासन संपवले.