New Ocean Africa Splitting: एकीकडी पृथ्वीच्या विनाशाची चर्चा सुरु आहे. तर, दुसरीकडे नवीन महासागर जन्माला येत आहे. आफ्रिका खंडाचे दोन भाग होत आहेत. जेव्हा हा खंड पूर्णपणे खंडित होऊन दोन तुकड्यांमध्ये विभागला जाईल तेव्हा पृथ्वीवर एक नवीन महासागर निर्माण होईल. मात्र, या खंडाचे दोन भाग का होत आहेत आणि याचे विभाजन नेमकं कधी होणार यावर संशोधक संशोधन करत आहेत.
पीअर रिव्ह्यूड जर्नल जिओफिजिकलमध्ये याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या महासागराची निर्मीती होताना भौगोलिक घटनाक्रम नेमका कसा असेल याबाबत सविस्तर माहिती जिओफिजिकल जर्नलमध्ये देण्यात आली आहे. जेव्हा एखादी टेक्टोनिक प्लेट तुटायला लागते तेव्हा त्याला भौगोलिक भाषेत रिफ्टिंग असे म्हणतात. रिफ्टिंग होत असताना जमिनीच्या वरच्या भागापासून भेगा पडायला लागतात. या भेगा जमीच्या खोलवर जातात. भेग पडलेल्या मोकळ्या जागेत समुद्र तयार होतो.
आयएफएल सायन्सनुसार, खंड वेगळे होण्याची ही पहिली भौगोलिक घटना नाही. अशीच घटना यापूर्वी देखील घडली आहे. सुमारे 138 दशलक्ष वर्षांपूर्वी, दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका वेगळे झाले होते. आफ्रिकेपासून वेगळं झाल्यानंतर लाल समुद्र आणि एडनचे आखात तयार झाले. आता आफ्रिकेतील इथिओपियाच्या वाळवंटात जमीनीला भेगा पडल्या आहेत. या भेगांची खोली आकार वाढत आहेत. 56 किमी लांबीच्या भेगा पडल्या आहेत. या नव्या महाद्वीपाची विभागणी पूर्व आफ्रिका रिफ्टशी करण्यात येत आहे.
पृथ्वीवर नव्याने उदयास येत असलेल्या या महासागरामुळे 6 देशांचा नकाशा बदलणार आहे. सध्या आफ्रिका खंडात 6 देश आहेत जे चारही बाजूंनी जमिनीने वेढलेले आहेत. मात्र, खंड खंडित झाल्यानंतर या 6 देशांना सागरी किनारा मिळणार आहे. रवांडा, युगांडा, काँगो, बुरुंडी, मलावी, झांबिया, केनिया, टांझानिया आणि इथिओपियामध्ये अशी या देशांची नावे आहेत.
2018 मध्ये केनियाची राजधानी नैरोबीपासून सुमारे 142 किमी अंतरावर असलेल्या नारोक नावाच्या एका छोट्याशा गावात अशीच भेग दिसली होती. मुसळधार पावसानंतरही भेगा वाढतच होती. पावसामुळे हे घडत असल्याचे वाटले. परंतु भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते जमिनीच्या आतील हालचालींमुळे वरती दरड तयार झाली. ही भेग दरवर्षी 7 मिमी दूर जात आहे. आफ्रिकेचा नवीन महासागर तयार होण्यासाठी किमान 5 दशलक्ष ते 10 दशलक्ष वर्षे लागतील.