मुंबई : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II ) यांच्या तब्येतीबाबत सर्वात मोठी अपडेट समोर येतेय. इंग्लंडमधील बॅकिंघम पॅलेसमधून (Buckingham palace) महाराणी एलिझाबेथ यांच्या तब्येतीबाबत बातमी समोर आली होती. राणी एलिझाबेथ यांचं वयाच्या 96 व्या वर्षी निधन झालं आहे. एलिझाबेथ यांचा 73 वर्षांचा मुलगा प्रिन्स चार्ल्स आता राजा आहे. तो आता राजा चार्ल्स III म्हणून ओळखला जाईल. 10 दिवसांच्या राजकीय शोकानंतर राणीवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
राणीच्या मृत्यूनंतर, लोक राणीनं 70 वर्षांच्या कारकिर्दीत वापरलेल्या असामान्य वस्तूंचा लिलाव करत आहेत. यामध्ये ईबेवर एक टी-बॅग (Tea Bag) देखील आहे. ही टी-बॅग 1998 मध्ये विंडसर कॅसलमधून तस्करी झाल्याचा दावा केला जात आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे eBay वर ही टी-बॅग 12 हजार डॉलर्स म्हणजेच 95 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीला विकण्यात येत आहे. राणीच्या निधनानंतर ईबेवर अशा अनेक वस्तूंचा लिलाव करण्यात येत आहे.
राणी एलिझाबेथ II यांचा जन्म लंडनमध्ये झाला. त्यांचा अभ्यास हा खाजगी शिक्षकांमार्फत घरीच झाला. एडवर्ड VIII यांनी राजीनामा दिल्यानंतर 1936 मध्ये एलिझाबेथ II यांच्या वडिलांनी सत्ता स्वीकारली. वडिलांच्या निधनानंतर एलिझाबेथ II राज्याच्या वारस ठरल्या. राणीचा राज्याभिषेक 1953 मध्ये झाला. राणीच्या राज्याभिषेकाचे भारतातील दूरदर्शनवर थेट प्रक्षेपणही करण्यात आले होते. एलिझाबेथ II यांच्या राजवटीत युनायटेड किंग्डममध्ये अनेक महत्त्वाचे बदल घडले.
The Queen died peacefully at Balmoral this afternoon.
The King and The Queen Consort will remain at Balmoral this evening and will return to London tomorrow. pic.twitter.com/VfxpXro22W
— The Royal Family (@RoyalFamily) September 8, 2022
आणखी वाचा : उत्तम अभिनयासाठी काही पण... अमिताभ बच्चन यांनी चक्क खऱ्या सापासोबत केला सीन शूट, खुद्द बिग बींकडून मोठा खुलासा
दरम्यान, महाराणी एलिझाबेथ II यांचे गुरुवारी रात्री उशिरा निधन झाले. राणी एलिझाबेथ यांची प्रकृती चिंताजनक असून त्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली असल्याचे इंग्लंडमधील बॅकिंघम पॅलेसमधून यापूर्वी सांगण्यात आले होते. राणी एलिझाबेथ 96 वर्षांच्या होत्या आणि त्यांच्या घराण्यातील सर्वात जास्त काळ राज्य करणारी महिला होत्या. जॉर्ज-6 च्या मृत्यूनंतर 1953 मध्ये त्यांचा राज्याभिषेक झाला.