मुंबई : भांडणं आणि ब्रेकअप हे तसं पाहाता सध्याच्या तरुणांसाठी थोडं कॉमन झालं आहे. प्रेम किंवा नातं म्हटलं की, भांडणं तर येतातच. परंतु आजकालची तरुण मंडळी आधी काहीही विचार न करता प्रेम करतात आणि मग ते नातं सहज संपवतात. ज्यामुळे त्यांना ब्रेकअपच्या प्रक्रियातून जावे लागते. प्रेमात लोक एकमेकांसाठी काहीही करायला तयार असतात, एवढंच काय तर एकमेकांमधील कमतरता देखील तेव्हा त्यांना दिसत नाही, परंतु ते जेव्हा वेगळे होतात, तेव्हा मग ते जोडीदारामधील कमतरता मोजून दाखवू लागतात.
एक विचित्र प्रकरण चीनमधून समोर आली आहे. ज्यामध्ये ब्रेकअप केल्यामुळे भलीमोठी शिक्षा मुलीला मिळाली आहे.
सोशल मीडियावर मिळालेल्या माहितीनुसार एका तरुणाच्या प्रेयसीने त्याच्याशी ब्रेकअप केलं. ज्यामुळे त्याने आपल्या गर्लफ्रेंडला ब्रेक अप बिल पाठवलं, जे पाहून गर्लफ्रेंडला धक्काच बसला. कदाचित हे बिल पाहून तिला ब्रेकअप केल्याचा पश्चाताप होत असावा.
हे प्रकरण ऐकायला खूप मजेदार वाटत असले तरी त्या व्यक्तीने हे खरोखर केलं आहे. या तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडवर केलेला खर्च एकत्र लिहून ठेवला आणि या खर्चाची भलीमोठी यादी तिला पाठवली आणि हे पैसे तिला परत करण्यासाठी सांगितले.
खर्चाचा ब्रेकअप लॉग सध्या चीनच्या सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय होत आहे. पाण्याच्या बाटलीपासून ते चिप्स आणि इतर स्नॅक्सपर्यंतचा हिशेबही या लॉग लिस्टमध्ये लिहिला गेला आहे. परिस्थिती काहीही असो, पण मुलाची स्मरणशक्ती आणि सर्जनशीलतेची लोक कौतुक करत आहेत, तर अनेकांना त्याचं हे वागणं पटलेलं देखील नाही.
व्यक्तीने तयार केलेल्या यादीत किरकोळ खर्चही लिहिला आहे. यामध्ये 2 पाण्याच्या बाटल्या आणि स्नॅक्सचा खर्चही समाविष्ट आहे. मुलीने एकटीने खाल्लेला नाश्ताही लिहिला आहे आणि जोडप्याचा खर्चही लिहिला आहे. रात्रीचे जेवण आणि जेवणाचा खर्च त्याने दोघांमध्ये अर्ध-अर्धा केला आहे.
मुलीची आई आजारी पडली होती, तेव्हा रुग्णालयात दाखल करण्याचा खर्च आणि तिच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठी देण्यात येणारा खर्च देखील या यादीत नमूद केला आहे.
ही संपूर्ण रक्कम 60,147,025 युआन म्हणजे भारतीय चलनात सुमारे 7 लाख रुपये आहे. मुलीने त्याला हे पैसे दिले की, नाही हे माहित नाही, परंतु हे जोडपं या प्रकरणानंतर भलतंच चर्चेत आलं आहे.