कधीकाळी बेरोजगार असणारा भारतीय होणार वॉरन बफेचा वारसदार...

जगातल्या सर्वात धनाढ्य व्यक्तींपैकी एक असलेल्या वॉरन बफेंचा वारसदार एक भारतीय होऊ शकतो.

Updated: Jan 11, 2018, 08:04 PM IST
कधीकाळी बेरोजगार असणारा भारतीय होणार वॉरन बफेचा वारसदार... title=

नवी दिल्ली : जगातल्या सर्वात धनाढ्य व्यक्तींपैकी एक असलेल्या वॉरन बफेंचा वारसदार एक भारतीय होऊ शकतो.

बफे आणि बर्कशायर हॅथवे

जगातले सर्वात मोठे गुंतवणुकदार, सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले वॉरन बफे आपल्या अर्थविषयक ज्ञानामुळे कायम चर्चेत असतात. त्यांच्या बर्कशायर हॅथवे या कंपनीबद्दलही कायम कुतुहल असतं. 

अजीत जैन व्हाईस चेअरमन

अजीत जैन आणि ग्रेगरी एबल या दोघांना प्रमोशन देण्यात आलं आहे. ग्रेगरी एबल हे बर्कशायर हॅथवेचे नॉन इंश्युरन्स बिजिनेसचे व्हाईस चेअरमन असतील तर अजीत जैन हे इंश्युरन्स बिजिनेसचे व्हाईस चेअरमन असतील. या दोघांनाही कंपनीच्या डायरेक्टर बोर्डात घेण्यात आलं आहे. 

बेरोजगार ते बर्कशायर

वॉरन बफे हेच कंपनीचे चेअरमन आणि चीफ एक्झिक्युटीव आहेत. बफेंची जागा घेण्याच्या स्पर्धेत अजीत जैन हे आघाडीवर आहेत. ते आयआयटीचे मेकॅनिकल इंजिनियर आहेत. करियरच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी आयबीएमचे सेल्समन म्हणून काम केलं. मात्र आयबीएमने भारतातलं काम बंद केल्यावर जैन बेरोजगार झाले. पुढे ते अमेरिकेत गेले आणि मॅकेंझी कंपनीत रूजू झाले. त्यानंतर १९८६ मध्ये ते बर्कशायरमध्ये आले. 

बफेंचे लाडके

आज अजित जैन १२,००० कोटींचे मालक आहेत. त्यांच्या कामावर बफे फार खूष आहेत. बफेंनी जाहिरपणे अजित यांची स्तुती केली आहे. जैनमुळे आपण अब्जावधी डॉलरची कमाई केली आहे. त्यामुळेच यापुढच्या काळात बफेनंतर कंपनीची सूत्रे जैन यांच्या हातात जाण्याचीच अधिक शक्यता आहे.