मुंबई : हे बाळ चौथ्या मजल्यावर एका खिडकीतून बाहेर आलं. हे बाळ जेव्हा खिडकीतून बाहेर आलं तेव्हा फक्त चालायला जागा असेल, अशा जागेवर चालू लागलं. या बाळाची आई अंघोळ करत होती, तितक्यात हे बाळ खिडकीतून असं बाहेर आलं. हा पालकांचा निष्काळजीपणा तर आहेच. पण ज्या प्रकारे या बिल्डिंगची खिडकी लहान मुलं सहज ओलांडू शकतात अशी आहे, त्यावरून अशी लहान मुलांसाठी धोकायदायक खिडकी तुमच्या घराला तर नाही ना. हे नक्की तपासून पाहा.
हे बाळ खिडकीच्या बाजूने बाहेर निघालं, भिंतीला धरून चालत पुढील गॅलरीत पोहचलं. पण त्या एवढ्याशा जीवाने केवढा मोठा धोका पत्करला होता, हे कोण सांगणार, आणि ज्या ठिकाणाहून हा व्हिडीओ काढण्यात आला, त्या व्यक्तीला ओऱडणं देखील शक्य नव्हतं, असं केलं असतं तर ते बाळ घाबरण्याचाही धोका होता.
सुदैवाने या बाळाला काहीही झालेलं नाही, तुम्ही संबंधित व्हिडीओत हे पाहू शकता, पण लहान मुलांची काळजी घेणे खूप आवश्यक आहे, हेच हा व्हिडीओ पाहिल्यानंतर शिकण्यासारखं आहे.