Crime News : ब्रिटनमध्ये (Britain) शिकणाऱ्या हैदराबादस्थित महिलेची हत्या झाल्यानंतर दोन दिवसांनी शुक्रवारी लंडनमध्ये (London) एका भारतीयाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. चाकूने वार करून केरळमधील या व्यक्तीची शुक्रवारी पहाटे लंडनच्या केंबरवेलमध्ये एकाने हत्या केली. 14 जून रोजी हैदराबादमधील 27 वर्षीय विद्यार्थिनीची लंडनमधील राहत्या घरी वार करून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर दोनच दिवसांनी अरविंद शशीकुमार (Arvind shashikumar) नावाच्या व्यक्तीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. पोलिसांनी (London Police) मारेकऱ्याला अटक केली आहे.
पोलिसांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळाल्यानंतर अधिकारी साउथॅम्प्टन, केंबरवेल येथे त्यांच्या घरी पोहोचले तेव्हा 38 वर्षीय भारतीय वंशाच्या अरविंद शशीकुमारचा मृतदेह सापडला. गुरुवारी रात्री 1.31 च्या सुमारास अरविंदच घरात मृत्यू झाल्याचे पोलिसांनी एक निवेदन जारी केले. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, अरविंद शशीकुमार याच्या हत्येच्या आरोपाखाली 25 वर्षीय सलमान सलीमला दुसऱ्याच दिवशी शनिवारी अटक करण्यात आली आहे.
हे दोघेही केंबरवेल येथे एकाच घरात राहत होते. केरळमधील पापिले नगर येथील रहिवासी असलेला शशिकुमारची सलमान सलीमने चाकूने वार करुन हत्या केली.. दक्षिणपूर्व लंडनमधील पेकहॅम येथील साउथहॅम्प्टन वे वर असलेल्या या घरात भांडण झाल्यानंतर अरविंदला सलमानने भोसकले अशी माहिती पोलिसांनी दिली. यात शशीकुमार यांचा जागीच मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालानंतर छातीवर वार झाल्याने शशीकुमारचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. सलीमला शनिवारी क्रॉयडॉन मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर केले असता त्याला कोठडी सुनावण्यात आली. गुन्ह्याचे साक्षीदार असलेल्या इतर दोन भारतीयांनाही तपासाचा एक भाग म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे.
स्टुडंट व्हिसावर आल्यानंतर शशीकुमार गेल्या 10 वर्षांपासून यूकेमध्ये राहत होता. शशीकुमारच्या मृत्यूची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे. याआधीही मंगळवारी, भारतीय वंशाची हॉकी खेळाडू ग्रेस ओ'मॅली कुमारचा मध्य इंग्लंडमधील नॉटिंगहॅमच्या रस्त्यावर चाकू हल्ल्याच्या मृत्यू झाला होता. मंगळवारी पहाटे हल्लेखोराने दोघांवर चाकूने वार केले तेव्हा ग्रेस ओ'मॅली कुमार मित्रासोबत होती.
दरम्यान, यापूर्वी हैदराबादमध्ये राहणाऱ्या 27 वर्षीय तेजस्विनी कोंथनची तिच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या ब्राझीलच्या व्यक्तीने चाकूने भोसकून हत्या केली होती. ही घटना 14 जून रोजी नील क्रिसेंट, नॉर्थ लुंड येथील घरात घडली. या हत्येप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली होती.