कोरोनाचे आणखी एक भयानक रूप समोर, आतापर्यंत नवा स्ट्रेन 29 देशांमध्ये पसरला

कोरोना विषाणूचे  (Coronavirus) आणखी एक भयानक रूप समोर आले आहे.  

Updated: Jun 18, 2021, 02:17 PM IST
कोरोनाचे आणखी एक भयानक रूप समोर, आतापर्यंत नवा स्ट्रेन 29 देशांमध्ये पसरला

जिनिव्हा : कोरोना विषाणूचे  (Coronavirus) आणखी एक भयानक रूप समोर आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) आपल्या अहवालात म्हटले आहे की, Lambda नावाच्या कोविड -19चा  (COVID-19) एक नवीन प्रकार ओळखला गेला आहे. जो आतापर्यंत 29  देशांमध्ये पसरला आहे. WHOने स्पष्ट केले की, हा नवीन प्रकार प्रथम पेरूमध्ये (Peru) ऑगस्ट 2020 मध्ये सापडला होता. त्यानंतर तो लॅटिन अमेरिका, अर्जेंटिना आणि चिलीसह 29 देशांमध्ये पोहोचला आहे.

Variables of Concern म्हणून वर्गीकृत

आमच्या सहयोगी वेबसाइट WIONमध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार जागतिक आरोग्य संघटनेने Lambda ला 'व्हेरिएबल ऑफ इंटरेस्ट' (Variable of Interest) म्हणून वर्गीकृत केले आहे. 'व्हेरिएबल्स ऑफ कॉन्सर' (Variables of Concern) म्हणून वर्गीकृत करण्यापूर्वी या व्हेरिएंटची प्रकृती आणि इन्फेक्टीव्हिटी पॉवरचे परीक्षण केले जाईल, असे WHOचे म्हणणे आहे. कोरोनाचे नवीन रूप किती प्राणघातक आहे, हे पुरेसे अभ्यासानंतरच स्पष्ट होईल.

 दोन प्रकारात Variants

Variants ला दोन प्रकारात विभागले गेले आहे. 'व्हेरिएबल्स ऑफ कॉन्सर' (Variables of Concern) महामारी रोगास कारणीभूत ठरू शकतो. स्पष्टच सांगायचे तर, या Variantsमध्ये वेगाने पसरण्याची आणि मोठ्या संख्येने लोकांना संक्रमित करण्याची क्षमता आहे. तर 'व्हेरिएबल ऑफ इंटरेस्ट'मध्ये ही क्षमता नाही.  यापूर्वी, डब्ल्यूएचओने अल्फा, बीटा, गामा आणि डेल्टा रूपे 'व्हेरिएबल्स ऑफ कॉन्सर' म्हणून वर्गीकृत केली आहेत.

डेल्टा व्हेरिएंट हे अलिकडील उदाहरण 

अलिकडील उदाहरण म्हणजे डेल्टा व्हेरियंट (Delta Variant) ज्याची ओळख भारतात प्रथम झाली. 11 मे 2021 रोजी त्याची ओळख असलेल्या 'इंटरेस्ट ऑफ इंटरेस्ट' म्हणून वर्गीकृत केली गेली. परंतु नंतर, जगभरात त्याचा वेगवान प्रसार लक्षात घेता, जागतिक आरोग्य संघटनेला त्याचे 'व्हेरिएबल ऑफ कन्सर्न' म्हणून वर्गीकरण करण्यास भाग पाडले गेले.