कोण आहे शारी बलोच? पाकिस्तानमधल्या आत्मघाती बॉम्बस्फोटामागे उच्चशिक्षित महिला

पाकिस्तानमधल्या स्फोटाने हादरलं चीन, उच्चशिक्षित महिलेने का घडवला स्फोट? वाचा

Updated: Apr 27, 2022, 10:56 PM IST
कोण आहे शारी बलोच? पाकिस्तानमधल्या आत्मघाती बॉम्बस्फोटामागे उच्चशिक्षित महिला title=

Women Suicide Bomber : पाकिस्तानात (Pakistan) कराची विद्यापीठात (Karachi University) झालेल्या बॉम्बस्फोटात तीन चिनी नागरिकांसह चार जणांचा मृत्यू झाला. कराची विद्यापीठाच्या कन्फ्युशिअस इमारतीजवळ (Confucius Institute) हा स्फोट झाला. एका बुरखाधारी आत्मघातकी महिलेनं हा स्फोट घडवून आणला. ही महिला गेटजवळ बसची वाट पाहात उभी होती. बस जवळ येताच या महिलेने डिटोनेटरच्या सहाय्याने भीषण स्फोट घडवला. 

शारी बलोच असं आत्मघातकी महिलेचं नाव आहे. अवघ्या 30 व्या वर्षी या उच्चशिक्षित महिलेनं बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी हा बॉम्बस्फोट घडवून आणला. 

शारी बलोच (Shari Baloch) या महिलेने झुलॉजी या विषयात मास्टर्स आणि एमफील ही डिग्री घेतलीय. ती एका शाळेत शिक्षिका होती. तिचे वडील हे सरकारी कर्मचारी होते. तर नवरा डेंटिस्ट. शारी बलोचला 8 वर्षांचा माहरोष आणि 4 वर्षांचा मीर हसन हे दोन मुलं आहेत. दोन वर्षांपूर्वी शारी बलोचने बलुचिस्तान लिबरेशन आर्मी ही संघटना जॉईन केली. या संघटनेवर पाकिस्तानात बंदी आहे. 

बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या (Balochistan Liberation Army) माजीद ब्रिगेडची ती सदस्य होती. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने आता पाकिस्तानातल्या चिनी नागरिकांना लक्ष्य करायला सुरूवात केली आहे. शारी बलोच या महिलेने हा फिदायीन हल्ला घडवल्यामुळे आता ती पहिली बलोच महिला आत्मघातकी हल्लेखोर झाली आहे. 

पाकिस्तानातले बलुचिस्तानी स्वतःला पाकिस्तानी समजत नाहीत. अगदी पाकिस्तानच्या निर्मितीपासूनच त्यांची स्वतंत्र देशाची मागणी होती. बलुचिस्तान हा पाकिस्तानातला सर्वात मोठा प्रांत पण इथे कोणतीही प्रगती नाही, पंजाबी वर्चस्व असलेल्या पाकिस्तानने बलुचिस्तानतल्या खनिज संपत्तीला केवळ ओरबाडलं. त्यामुळे बलुचिस्तान लिबरेशन आर्मी सातत्याने स्वातंत्र्यासाठी लढत आहे. 

बीएलएचे हल्ले पाकिस्तानला नवे नाहीत. मात्र आता एक उच्चशिक्षित महिला फिदायीन झाल्यामुळे पाकिस्तानात चिंतेचं वातावरण आहे. स्वातंत्र्याच्या प्रेरणेने भारलेल्या बलुचींनी  चीनलाही सणसणीत चपराक लगावली आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x