9 बायकांसोबत राहाता यावं म्हणून 'प्रेमाचा टाइम टेबल' त्यानं काढला खरा, पण...

खरंतर आर्थरने आपल्या 9 बायकांना समान वेळ देता यावा यासाठी 'टाईम टेबल' बनवलं. परंतु...

Updated: Apr 27, 2022, 10:03 PM IST
9 बायकांसोबत राहाता यावं म्हणून 'प्रेमाचा टाइम टेबल' त्यानं काढला खरा, पण... title=

मुंबई : इथे लोकांना एक बायको सांभाळायला शक्य होत नाही तिथे एका व्यक्तीने चक्कं 9 महिलांशी लग्न केलं आहे. बऱ्याचदा आपण टीव्ही किंवा सिनेमात पाहिलं असेल की, जेव्हा व्यक्तीला दोन बायका असतात, तेव्हा तर त्याची दयनीय अवस्था होते. परंतु या व्यक्तीला चक्कं 9 बायका आहेत. म्हणजे या व्यक्तीचं काय होत असेल त्याचं त्यालाच माहित. खरंतर या व्यक्तीचं नाव आर्थर आहे, जो ब्राझिलचा रहिवासी आहे. त्याचं 9 लग्न जग जाहीर आहे. 

खरंतर आर्थरने आपल्या 9 बायकांना समान वेळ देता यावा यासाठी 'टाईम टेबल' बनवलं. परंतु त्याचा त्याला काहीही फायदा झाला नाही.

या टाईम टेबलबद्दल आर्थर म्हणाला- "मला आपल्या आयुष्यात खूप मजा आणि आनंद मिळवायचा आहे. ज्यासाठी मी टाईम टेबल बनवलं आणि त्या प्रमाणे प्रेम करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या. कारण माझ्या मनात नसलं तरी देखील मला वेळापत्रकाप्रमाणे प्रेमात पडावं लागतं होतं. जो एक प्रकारचा दबाव तयार करत होता."

आर्थर म्हणाला, ''टाइम टेबल रोमान्स आमच्यासाठी योग्य पर्याय नव्हता. म्हणून आम्ही त्याला थांबवलं आहे.''

आर्थर पुढे म्हणाला की, मुक्त प्रेम साजरे करण्यासाठी आणि एकपत्नीत्वाला विरोध करण्यासाठी त्याने 9 विवाह केले.

खरंतर आर्थरच्या पहिल्या बायकोनं त्याच्या या वागण्याचा विरोध केला आणि त्याला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला, कारण तिला फक्त तो एकटा हवा होता जे शक्य नव्हतं.

पहिल्या बायकोच्या या निर्णयामुळे मी दुखावलो गेलो असल्याचं अर्थचं म्हणणं आहे.