दुबईत चक्क मॉलमध्ये बाप्पा

शहरातील मिनाबाजार मॉलमध्ये चक्क श्री गणेशाच्या मूर्ती उपलब्ध आहेत. दुबई, शारजा, अबुधाबी या भागात मोठ्या प्रमाणात मराठी आणि भारतीय बांधव राहतात. त्यांच्याकडं घरगुती गणेशोत्सव असतो. त्याशिवाय महाराष्ट्र मंडळामार्फत सार्वजनिक गणेशोत्सवही साजरा होतो. 

Updated: Aug 22, 2017, 11:58 PM IST
दुबईत चक्क मॉलमध्ये बाप्पा title=

दुबई : शहरातील मिनाबाजार मॉलमध्ये चक्क श्री गणेशाच्या मूर्ती उपलब्ध आहेत. दुबई, शारजा, अबुधाबी या भागात मोठ्या प्रमाणात मराठी आणि भारतीय बांधव राहतात. त्यांच्याकडं घरगुती गणेशोत्सव असतो. त्याशिवाय महाराष्ट्र मंडळामार्फत सार्वजनिक गणेशोत्सवही साजरा होतो. 

मुंबई आणि पेणहून मागवलेल्या या गणेशमूर्ती  ७० दिरामपासून ८०० दिराम एवढ्या किंमतीला इथं विकल्या जातायत. सजावटीचं साहित्य, पूजा साहित्य, कंठी, धूप, कापूर, अगरबत्ती, मिठाया, फुलं आणि फळांनी इथले मॉल सजलेत. दुबईत शुक्रवारी आणि शनिवारी साप्ताहिक सुट्टी असते. यंदा त्याच दिवशी नेमकी गणेशचतुर्थी आल्यानं उत्सवाचा आनंद द्विगुणीत झालाय.