केस कापायला गेलेल्या तरुणाचे न्हाव्याने कान कापले

न्हावी आणि वकिलाशी केव्हा पंगा घेऊ नये, तुमची 'नस' त्यांच्याकडे असते अस मजेत म्हटल जात. पण कधी जेव्हा हे खर होत तेव्हा चांगलाच मनस्ताप होतो. एका युवकालाला अशाच प्रकारच्या मनस्तापाल सामोरे जावे लागले आहे. 

Pravin Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Dec 30, 2017, 01:30 PM IST
 केस कापायला गेलेल्या तरुणाचे न्हाव्याने कान कापले

विस्कॉन्सिन : न्हावी आणि वकिलाशी केव्हा पंगा घेऊ नये, तुमची 'नस' त्यांच्याकडे असते अस मजेत म्हटल जात. पण कधी जेव्हा हे खर होत तेव्हा चांगलाच मनस्ताप होतो. एका युवकालाला अशाच प्रकारच्या मनस्तापाल सामोरे जावे लागले आहे. 
  
'द सन' न्यूज पोर्टलने दिलेल्या वृत्तानुसार, केस कापायला गेलेल्या युवकाचे न्हाव्याने कान कापल्याची घटना अमेरिकेतील विस्कॉन्सिनमध्ये समोर आली आहे. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

२२ वर्षीय तरुण ख्रिसमसनिमित्त केसांना नवी स्टाईल देऊ इच्छित होता. पण न्हाव्याने त्याचे अर्धटक्कल करुन टाकले आणि कानावरही गंभीर जखमा केल्या.

तरुणाचे अर्ध टक्कल 

इलेक्ट्रॉनिक रेजर वर नंबर दोनचा क्लिपर लावून केस कापण्यास त्याने न्हाव्याला सांगितले. पण तो बसल्या बसल्या न्हाव्याने त्याचे कान पकडून फिरविले.

'तु जास्त हालचाल करतोयस' असे कारण त्याने सांगितले. न्हाव्याने कैची त्याच्या कानावरून फिरवली आणि इलेक्ट्रॉनिक रेजरने तरुणाचे अर्ध टक्कल केले.

बघता बघता युवकाचा संपूर्ण लूकच बदलून गेला होता. 

न्हाव्याला अटक 

यानंतर त्या तरुणाने न्हाव्याविरूद्ध पोलीस तक्रार केली. हे सर्व त्याने मुद्दम केल्याचे त्याने तक्रारीत सांगितले.

त्यानंतर न्हाव्याला अटक करण्यात आली आहे. या भयानक घटनेनंतर त्या तरुणाने स्वत:चे संपूर्ण टक्कल केले.

 

( सोशल मीडियावर ही घटना व्हायरल होत आहे. याच्या सत्यतेशी 24.taas.com सहमत असेलच असे नाही)