Bedsheet Cleaning Tips : ऑफिसमधून घरी गेल्यावर प्रत्येकाना वाटतं की आता मस्त छान झोपावं. आपल्या बेडवर असलेली बेडशीट ही फक्त गादीला वाचवण्यासाठी नाही तर बेडरूमला सुंदर दिसण्यासाठी पण मदत करते. पण जर आपल्या बेडवर अंथरलेली बेडशीट चांगली नसेल तर आपली चिडचीड होते. त्यामुळे आपल्या बेडशीटची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण अस्वच्छ बेडशीट ही आपल्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम करून जाते. त्यामुळे बेडशीट कितीवेळा आणि कधी धुवावी हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे.
बेडशीट जो पर्यंत खराब होत नाही तोपर्यंत धूत नसाल तर घ्या काळजी. कारण बराचवेळ बेडशीट धुतली नाही तर घाम आणि धूळ बसत त्यावर बॅक्टेरिया निर्माण होतो. ज्यामुळे आपल्या आरोग्यावर फक्त परिणाम होत नाही तर आपली बेडशीट देखील खराब होते. त्यामुळे जमत असेल तर आठवड्यातून एकदा बेडशीट धुवा नाही तर कमीत कमी दोन आठवड्यातून एकदा.
जास्त प्रमाणात डिटर्जेंट वापरता?
कधीपण बेडशीट धुताना खूप जास्त डिटर्जेंट वापरू नका त्यामुळे बेडशीटचा रंग फिका होऊ शकतो. त्यामुळे बेडशीट साफ करताना फक्त एक छोटा चमचा डिटर्जेंट वापरा.
गरम पाण्यात बेडशीट धुणे?
काही लोकांना बेडशीट गरम पाण्यात धुण्याची सवय असते. त्यांना असं वाटतं की गरम पाण्यात बेडशीट धुतल्यास लवकर डाग जातील. पण हा चुकीचा विचार आहे कारण गरम पाण्यात बेडशीट भिजवल्यास त्यावर असणारे डाग आणखी घट्ट होतात. इतकंच नाही तर त्यानं बेडशीटचा रंग देखील फिका होतो.
हेही वाचा : Gaurav More नं 'हास्यजत्रे'तून घेतला ब्रेक? फोटो शेअर करत म्हणाला...
सगळ्या कपड्यांसोबत बेडशीट धूवू नका
जर तुम्हाला सगळ्या कपड्यांसोबत बेडशीट धूण्याची सवय असेल तर आजच ही सवय सोडा. कारण त्यामुळे दोन गोष्टी होऊ शकतात. एक म्हणजे एकतर तुमची बेडशीट नीट साफ होणार नाही किंवा मग तुमचे इतरे कपडे खराब दिसू लागतील. याशिवाय आणखी एक गोष्ट म्हणजे कपड्यांना असलेले बटन किंवा मग चैन लागल्यानं बेडशीटचा कपडा खराब होऊ शकतो.
बेडशीट धुण्याआधी वाचा लेबल
बेडशीट धुण्याआधी कधीपण तिच्यावर असलेले लेबल वाचा. त्यात ज्या प्रमाणे बेडशीट धुण्याचा सल्ला दिला असेल त्या प्रमाणेच बेडशीट धुवा. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण हे जर आपण केलं नाही तर आपली बेडशीट पहिल्यांदा धुतानाच खराब होऊ शकते. काही बेडशीट्सला टंबल ड्रायरमध्ये न टाकण्याचा सल्ला देण्यात येतो. तर काही बेडशीटला कोमट पाण्यात धुण्यास सांगितले जाते. आपण जर लेबल वाचलं तर नक्कीच आपल्या बेडशीट या जास्त काळ टिकून राहतील.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)