Gaurav More नं 'हास्यजत्रे'तून घेतला ब्रेक? फोटो शेअर करत म्हणाला...

Gaurav More Maharashtrachi Hasyajatra : गौरव मोरे हा महाराष्ट्राच्या हास्यजत्रेतील फिल्टर पाड्याचा बच्चन म्हणून ओळखले जातात. गौरव मोरे आता लंडनला गेला असून त्याचं कारण माहित नाही आहे. दरम्यान, गौरवनं शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Updated: May 27, 2023, 04:43 PM IST
Gaurav More नं 'हास्यजत्रे'तून घेतला ब्रेक? फोटो शेअर करत म्हणाला... title=
(Photo Credit : Gaurav More Instagram)

Gaurav More : महाराष्ट्राची हास्यजत्रा हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराचे लाखो चाहते आहेत. कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराची एक खास ओळख आहे. तर आपल्या सगळ्यांचा लाडका फिल्टर पाड्याचा बच्चन म्हणजेच गौरव मोरे तर सगळ्यांच्या मनावर राज्य करतो. त्यांच्या चाहत्यांच्या यादीत रोजच अनेकांच्या संख्येन वाढ होताना दिसते. हास्यजत्रेतून पुढे आलाला गौरव आता लंडन दौऱ्यावर निघाला आहे. तर त्यामुळे गौरवनं हास्यजत्रेतून ब्रेक घेतला की काय असा प्रश्न त्याच्या अनेक नेटकऱ्यांना पडला आहे. 

गौरव मोरेनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली होती. त्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्टमध्ये त्यानं लंडन कॉलिंग असं कॅप्शन देखील दिलं आहे. गौरवनं शेअर केलेल्या या फोटोमुळे त्याच्या काही चाहत्यांना प्रश्न पडला आहे की गौरव लंडनला नक्की का जात आहे? खरंतर याचं नक्की कारण काय आहे हे कळलेलं नाही. तर गौरव जेव्हा तिथे गेल्यानंतर काही पोस्ट करेल तेव्हाच या विषयी नक्की त्याच्या सगळ्या चाहत्यांना कळेल. पण याआधी गौरव हा अभिनेता भरत जाधव यांच्यासोबत एका चित्रपटाचं चित्रीकरण करत होता. त्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गौरव हा भरत जाधव यांच्यासोबत लंडनलाच गेला होता. त्या चित्रपटाच्या निमित्तानं गौरव पहिल्यांदाच लंडनला देखील गेला होता. पण तुम्हाला माहितीये का फक्त लंडन नाही तर परदेशात जाण्याची गौरवची ही पहिलीच वेळ होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

भरत जाधव यांच्या सोबत एकाच चित्रपटात काम करण्यावर गौरव एका मुलाखतीत म्हणाला होता की, “चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी भरत जाधव सरांबरोबर लंडनला निघालो आहे. खूप उत्सुकता आहे. तसंच खूप भारी वाटत आहे. ज्यांना मी बाल्कनीमधून पाहिलं आहे त्यांच्याबरोबर मी आज प्रवास करत आहे”. 

हेही वाचा : Manoj Bajpayee यांचा चित्रपट पाहिल्यानंतर पत्नीला वाटली होती लाज, म्हणाली "पैशांसाठी..."

Gaurav More took break from Maharashtrachi Hasyajatra know in detail

दरम्यान, गौरव मोरेनं काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत हास्यजत्रेत सतत त्याचा अपमान का होतो याविषयी सांगितलं होतं. गौरवनं ही मुलाखत ‘बीबीसी न्यूज मराठी’ला दिली होती. यावेळी गौरव म्हणाला होता की "माझा होत असलेला अपमान हा मी एण्जॉय करत असतो. कधी कधी कोणत्या स्किटमध्ये माझा अपमान कमी झाला, तर अजून एखादा विनोद माझ्यावर हवा असं मी स्वतःहून सांगतो. वनिता आणि मी बऱ्याचदा एकत्र स्किट करतो. खरात काकुंच्या स्किटवेळी मी स्वतः तिला सांगतो की, मी तुझ्या जवळ आल्यानंतर तू मला जोरात मार. वनितालाही ते करतााना मजा वाटते."