युक्रेन राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी देश सोडला, पोलंडला पळाले?

Russia Ukraine War​ : रशिया - युक्रेन युद्धातील आताची सर्वात मोठी बातमी हाती आली आहे. रशियन मीडियाचा खळबळजनक दावा.  

Updated: Mar 4, 2022, 08:14 PM IST
युक्रेन राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी देश सोडला, पोलंडला पळाले? title=

मास्को : Russia Ukraine War : रशिया - युक्रेन युद्धातील आताची सर्वात मोठी बातमी हाती आली आहे. रशियन मीडियाचा खळबळजनक दावा. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की (Ukrainian President Volodymyr Zelensky) यांनी पलायन केल्याचा दावा रशियन वृत्तपत्रांनी केला आहे. युक्रेन सोडून झेलेन्स्की पोलंडला पळाले, असल्याचे आपल्या वृत्तात म्हटले आहे. व्होलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांना ठार करण्याचे रशियाचे आटोकाट प्रयत्न आहेत.

रशिया-युक्रेन युद्धाचा नववा दिवस आहे. रशियन सैन्यामार्फत युक्रेनवर हल्ले सुरूच आहेत. अशाच एका हल्ल्याचा व्हिडिओ समोर आलाय. युक्रेनच्या बोकेझेन्सी भागात रशियाने केलेल्या हल्ल्यात मोठे नुकसान झाले. या दृश्यात अख्ख गाव उद्ध्वस्त झाल्याचे दिसत आहे. इमारती बेचिराख झाल्या आहेत. तसेच रशिया हल्ल्यात उद्ध्वस्त झालेल्या युक्रेनची नवी दृश्य समोर आली आहेत. कीव शहरातली ही दृश्य आहेत. कीव शहराचं अक्षरश: भग्न झाले आहे. अनेक इमारती जमीनदोस्त झाल्याचं दिसून येते आहे.

युरोपातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प असलेल्या झापोरेझ्झ्या प्रकल्पावर रशियाने हल्ला केल्याचा आरोप युक्रेनने केला आहे. अणुऊर्जा प्रकल्पावर गोळीबार केल्याने रेडिएशनची लेवल वाढल्याचाही दावा युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केलाय. मात्र आंतरराष्ट्रीय अणुउर्जा परिषदेने रेडिएशनमध्ये बदल झाला नसल्याचं स्पष्ट केलंय. 

Residential building in Ukrainian capital Kyiv struck by missile, visuals emerge

झापोरेझ्झ्या हा प्रकल्प सर्वात मोठा असून, स्फोट झाल्यास चर्नोबीलपेक्षा दहापट नुकसान होण्याची शक्यता आहे. यामुळे कोट्यवधींचीही मनुष्यहानीही होऊ शकते. दरम्यान या हल्ल्याची गंभीर दखल अमेरिकेने घेतलीय. अध्यक्ष जो बायडन यांनी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी झापोरिझ्झ्यासंदर्भात चर्चा केली आहे.