नवकोट नारायण....! पाहा कोण आहे बिल गेट्स यांचा कोट्यधीश जावई

बिल गेट्स यांच्या लेकीचं ख्रिस्ती पद्धतीने नव्हे, तर इस्लाम धर्म पद्धतीनं पार पडलं लग्न...

Updated: Oct 20, 2021, 08:37 PM IST
नवकोट नारायण....! पाहा कोण आहे बिल गेट्स यांचा कोट्यधीश जावई

न्यूयॉर्क : मायक्रोसॉफ्टचे संस्थापक  बिल गेट्स यांची मोठी मुलगी जेनिफर गेट्सने तिच्या लॉन्गटाइम प्रियकराशी इस्लामिक पद्धतीनुसार लग्न केले आहे. त्यांचं लग्न शनिवारी न्यूयॉर्कच्या वेस्टचेस्टरमधील 142 एकरच्या गेट्स फॅमिली फार्ममध्ये पार पडले. जेनिफर गेट्सचा प्रियकर नेल नासर हा इजिप्शियन-अमेरिकन व्यावसायिक घोडेस्वार आहे. दोघांनी गेल्या वर्षी लग्न केले होते. दोघांनी गेल्यावर्षी त्यांनी साखरपुडा केला. सध्या सर्वत्र त्यांच्या लग्नाची चर्चा आहे. 

फॉक्स बिझनेसनुसार, जेनिफर गेट्स आणि नायल नासर यांनी एका खासगी मुस्लिम समारंभात लग्न केले. जेनिफर शनिवारी तिच्या लग्नाच्या गाऊनमध्ये ब्राइड्समेड्ससोबत पोझ देताना दिसली. जेनिफरच्या लग्नाचा गाऊन अमेरिकेच्या प्रसिद्ध फॅशन डिझायनर वेरा वॅंग यांनी डिझाईन केला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अमेरिकी फॅशन डिजाइनर वेरा वँग यांनी काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. वेडिंग गाऊनमध्ये जेनिफर अत्यंत सुंदर दिसत आहे. लग्नात बिल आणि मेलिंडा गेट्स व्यतिरिक्त, त्यांचे भाऊ रोरी आणि बहीण फोबे उपस्थित होते. बिल गेट्स यांची सावत्र आई मिमी गार्डनर गेट्स देखील या लग्नात होत्या.

वोगच्या रिपोर्टनुसार, लग्नाची सुरुवात कातब अल किताबने झाली, जो इस्लामिक विवाह सोहळा आहे. हा सोहळा शुक्रवारी केवळ जेनिफर आणि नयल यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडला. मीडिया रिपोर्टनुसार, या लग्नासाठी जवळपास तब्बल 2 मिलियन डॉलर खर्च झाल्याची शक्यता आहे.