Blue Meteor Spain: आकाशामध्ये असलेल्या ग्रह ताऱ्यांविषयी प्रत्येकाच्या मनात कुतूहल असते. आपण तिथंपर्यंत कधी पोहोचू माहिती नाही, पण शक्य होईल तसे दुर्बिणीच्या, कॅमेराच्या सहाय्याने येथील क्षण टिपण्याचा अनेकजण प्रयत्न करतात. यातील अनेकांना यश देखील येते. असाच काहीसा सुखद अनुभव एका तरुणीला आला आहे.19 मे रोजी स्पेन आणि पोर्तुगालच्या आकाशात एक उल्का पडताना दिसली. त्यानंतर सोशल मीडियात उल्का तुटतानाचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले.
उल्का तुटल्यामुळे संपूर्ण आकाश निळ्या रंगात चमकत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. ही उल्का तुटून आकाशात वेगाने जाताना दिसली. हा क्षण पाहणे म्हणजे आनंदाची पर्वणीच होती. अनेकांनी या दृश्याचा व्हिडिओ आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. हे व्हिडीओ आतापर्यत जगभरातील लाखो लोकांनी पाहिले आहेत. व्हिडीओ शेअरही केले जात आहेत.
This girl captured the COOLEST video of the meteor that fell in Portugal pic.twitter.com/NrunWrVGcS
— Nature is Amazing (@AMAZlNGNATURE) May 20, 2024
एक मुलगी तिच्या फोनचा कॅमेरा चालू करून व्हिडिओ शूट करत होती. त्यावेळी तिच्या फोनच्या कॅमेऱ्यात एक तुटलेली उल्का कैद झाली. हे पाहून मुलगी आनंदाने उडी मारतेय असे एका व्हिडीओममध्ये दिसून आले आहे. पडलेल्या उल्का कॅस्ट्रो डायर शहराजवळ पडल्या असाव्यात, असा अंदाज काही मीडिया रिपोर्टमध्ये लावण्यात आला आहे. असे असले तरी उल्का पृथ्वीच्या पृष्ठभागावर आदळली आहे की नाही या वृत्ताला कोणताही दुजोरा देण्यात आला नाही.
This girl captured the COOLEST video of the meteor that fell in Portugal pic.twitter.com/NrunWrVGcS
— Nature is Amazing (@AMAZlNGNATURE) May 20, 2024
@AMAZlNGNATURE नावाच्या अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ अपलोड झाल्यापासून आतापर्यंत 7 मिलियन लोकांनी पाहिला आहे. एवढेच नव्हे तर 3 लाख लोकांनी तो लाईक केलाय तर अनेकजण यावर कमेंट्स करत आहेत.
व्वा! किती सुंदर आहे हे दृश्य, असे एक युजर म्हणताना दिसतोय. तर दुसऱ्या पोस्टमध्ये, तुटलेली उल्का एका इमारतीवरून जाताना दिसत आहे. त्याचवेळी हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी बाहेर लोकांची गर्दी जमल्याचेही व्हिडीओमध्ये दिसत आहे.