बुलडोजरचा जलवा! 5 मिनिटांत 100 बाईकचा चक्काचूर, पाहा VIDEO

बुलडोजरची ताकद काय, ते फक्त हा एक VIDEO पाहून तुमच्या लक्षात येईल 

Updated: Jun 24, 2022, 10:43 AM IST
बुलडोजरचा जलवा! 5 मिनिटांत 100 बाईकचा चक्काचूर, पाहा VIDEO title=

नवी दिल्ली : बुलडोजर पाहिला तरी आपल्याला एक क्षण भीती वाटते. भलामोठा बुलडोर काय करू शकतो ते आपण पाहातो. भारतात अवैध कामावर गेल्या काही महिन्यात बुलोजर चालत असल्याचं दिसत आहे. तसाच बुलडोजरचा जलवा परदेशातही पाहायला मिळाला आहे. 

न्यूयॉर्क शहरातील महापौर एरिक एडम्स यांनी शहरातील 100 बाईकवर कारवाई केली. यावेळी त्यांनी नुसता इशारा दिला नाही, तर बाईकवर चक्क बुलडोजर चालवला. 5 मिनिटांत 100 बाईकचा खेळ खल्लास झाला. 

5 मिनिटांत 100 हून अधिक दुचाकीचा चक्काचूक झाला. न्यूयॉर्क शहरातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरून बुलडोजरची ताकद आणि त्याचा परदेशातील जलवा पाहायला मिळत आहे. 

रॉयटर्सने हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. डर्ट आणि जप्त केलेल्या बाईकवर बुलडोजर फिरवला. हा व्हिडीओ 1.5 मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे. नेहमी अवैध बांधकामांवर किंवा दारूच्या बाटल्यांवर चालणारा बुलडोजर आता बाईकवर फिरवण्यात आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.