बापरे! 60 वर्षांपासून धगधगतंय 'हे' भुताटकी शहर, इथं राहतात फक्त 5 नागरिक

जमिनीतून येतोय धूर... त्या एका घचटनेमुळं होत्याचं नव्हतं झालं...   

Updated: Aug 24, 2022, 11:24 AM IST
बापरे! 60 वर्षांपासून धगधगतंय 'हे' भुताटकी शहर, इथं राहतात फक्त 5 नागरिक  title=
Burning City in usa centralia city read details

Burning City : हे जग इतकं मोठं आहे, की त्याचा प्रत्येक कोपरा एक नवी कहाणी सांगतो. प्रत्येक वेळी ही कहाणी तुम्हाला आनंद देणार असेल असं नाही. काही गोष्टी तुम्हाला हादरवूनही सोडतील. सध्या अशीच एक गोष्ट समोर आली आहे. जिथं मागील 60 वर्षांपासून धुमसणारं शहर जगासमोर आलं आहे. 

अमेरिकेच्या पेंसिल्वेनियातील हे शहर. आतापर्यंत या शहरातील नागरिकांनी तेथून पळ काझला आहे. 1962 पासून इथं आग लागली आणि तेव्हापासून यंत्रणा ही आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. या जवळपास निर्मनुष्य शहराचं नाव आहे सेंट्रलिया. (Burning City in usa centralia city read details) 

इथं जमिनीच्या खाली आग धुमसत असून, जमिनीवर पडलेल्या भेगांमधून विषारी वायू बाहेर पडत आहे. पुढची 100 वर्षे ही आग अशीच धुमसत राहील असाही दावा करण्यात येत आहे. 

... आणि शहर भकास झालं 
अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर असणारं हे शहर तिथं असणाऱ्या खाणींसाठी ओळखलं जातं. इथं मोठ्या प्रमाणात खाणकाम चालत होतं. मे 1962 मध्ये इथे कचऱ्याच्या ढिगाला आग लागली आणि ती पसरत पसरत जमिनीखाली असणाऱ्या कोळशाच्या खाणीपर्यंत पोहोचली. या घटनेला 60 वर्ष उलटूनही ती आजसुद्धा धुमसत आहे. 

वाचा : एका चुकीसाठी बॉसनं कर्मचाऱ्याला दांड्यानं बदडलं, व्हायरल Video पाहून तुम्हालाही बसेल धक्का

 

आग विझवण्यासाठी शासनानं कैक प्रयत्न केले. पण, त्यांना अपयशच हाती लागलं. सध्या इथं जमिनीला पडलेल्या भेगांमधून कार्बन मोनॉक्साइडसारखे विषारी वायू बाहेर पडत आहेत. परिणामी नागरिकांना शहरात राहणं कठीण झाल्यामुळं आता हे शहरच भकास झालं आहे. 

उपलब्ध माहितीनुसार आता या शहरात फक्त 5 नागरिक राहतात. 1983 मध्ये येथील राज्य शासनानं हस्तक्षेप घेत शहरातील नागरिकांना स्थलांतरित केलं. पण, 5 नागरिकांनी मात्र यास नकार देत इथंच थांबण्याचा निर्णय घेतला. यासाठी ते कायदेशीर लढाईसुद्धा लढले. पण, 2022 पर्यंत या शहरातील स्थानिक दळणवळणाच्या सोयीसुद्धा नसल्यात जमा आहे. थोडक्यात हे शहर 'घोस्ट-टाउन' अर्थात भुताटकी शहर होण्याच्या मार्गावर आहे.