सस्पेंस संपला! अब्जाधीश Warren Buffet नंतर ही व्यक्ती सांभाळणार कारभार

Warren Buffet हे जगातील श्रीमंताच्या यादीतील एक व्यक्तिमत्व आहे

Updated: May 4, 2021, 02:17 PM IST
सस्पेंस संपला! अब्जाधीश Warren Buffet नंतर ही व्यक्ती सांभाळणार कारभार title=
representative image

नवी दिल्ली : Warren Buffet हे जगातील श्रीमंताच्या यादीतील एक व्यक्तिमत्व आहे. वॉरेन बफे बर्कशायर हाथवे कंपनीचे सीईओ आहेत. अब्जाधीश असलेल्या वॉरेन यांच्या नंतर बर्कशायरचा उत्तराधिकारी कोण याबाबत अनेक चर्चा होत होत्या.  या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. Bloomberg Billionaires Index च्या अहवालानुसार वॉरेन जगातील 104 अब्ज डॉलरची संपत्ती असलेले जगातील 8 श्रीमंत व्यक्ती आहेत.

एबेल होणार उत्तराधिकारी
वॉरेन यांनी म्हटले आहे की, माझे काही बरेवाईट झाल्यास माझ्या नंतर हाथवेच्या सीईओपदी कंपनीच्या नॉन इंश्योरंन्स उद्योगाचे उपाध्यक्ष ग्रेग एबेल कंपनीचे सीईओ होऊ शकतात. बर्कशायर हाथवेंची संपत्ती 630 अब्ज डॉलरची आहे.  90 वर्ष वयाचे वॉरेन यांनी कंपनीच्या बोर्डाचा प्रस्ताव मान्य केला आहे. की त्यांच्या नंतर 58 वर्षाचे एबेल त्यांचे उत्तराधिकारी असतील. 

बर्कशायरचे उपाध्यक्ष चार्ली मुंगेर (Charlie Munger)यांनी शनिवारी झालेल्या वार्षिक बैठकीत एबेल यांना वॉरेन यांचे उत्तराधिकारी बनवले जाऊ शकते असे संकेत दिले होते. त्यामुळे या चर्चांना अधिक वेग आला होता.

वॉरेन यांचा एबेलवर विश्वास का?
एबेल अद्याप 60 वर्षाचे नाहीत. तसेच त्यांना कंपनीच्या शैलीचा आणि कामाचा चांगला अनुभव आहे. बोर्ड ऑफ डायरेक्टर्संना देखील हे मान्य आहे. की, वॉरेन यांच्या नंतर एबेल कंपनीची धूरा समर्थपणे सांभाळू शकतील.