मुंबई : कॅनडा खासदार सदस्याचे व्हिडिओ कॉन्फरन्स दरम्यान बिना कपड्यात दिसले. हाऊस ऑफ कॉमन्सच्या डिजिटल माध्यमातून सुरू असलेल्या बैठकी दरम्यान ही बाब समोर आली आहे. (Canada MP naked during video conference) या बैठकी दरम्यानचे फोटो समोर आले आहेत.
पोंटिएकचे क्यूबेक जिल्ह्यात 2015 पासून प्रतिनिधित्व करत असलेल्या विलियम अमोस बुधवारी आपल्या सदस्यांच्या स्क्रीनवर पूर्ण नग्न अवस्थेत दिसले. कोरोनाच्या या महामारीमुळे कॅनडा व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून खासदार या सभेत सहभागी झाले.
Anyone recognize this MP wandering around in the buff in their office while taking part in the hybrid Parliament? Obviously, given the flag, they are from Quebec. Wonder what kind of mobile phone he uses? #cdnpoli pic.twitter.com/HWOeR9ZJBV
— Brian Lilley (@brianlilley) April 14, 2021
द कनाडियन प्रेसला मिळालेल्या एका स्क्रीनशॉर्टमध्ये डेस्कच्या मागे उभे होते. त्यावेळी त्यांनी कपडे घातले नव्हते. अमोसने ईमेलद्वारे दिलेल्या माहितीनुसार, ही एक दुर्भाग्याची गोष्ट आहे. त्यांनी म्हटलं की,'जॉगिंगमधून आल्यानंतर मी कामाकरता तयार होत असताना कपडे बदलत होतो. तेव्हा माझा व्हिडिओ चुकून सुरू झाला. चुकून झालेल्या या गोष्टीमुळे मी हाऊस ऑफ कॉमन्समधील माझ्या साथीदारांची माफी मागितली आहे. निश्चितपणे ही चूक झाली आहे. ही चूक पुन्हा होणार नाही.'
"I think that this, today, we have beaten— we have set a new record. We've seen a member during Question Period improperly dressed — that is, uh… unclothed." pic.twitter.com/a3fProg7q7
— Jonathan Goldsbie (@goldsbie) April 14, 2021
विरोधी पक्षताली क्यूबेकोइस पार्टीचे खासदार, क्लाउडे बेलेफियोलिने प्रश्नकाळानंतर या मुद्यावर चर्चा झाली. संसदेत खासदारांनी ट्राऊजर, अंडरविअर, शर्ट, जॅकेट आणि टाय घालणं गरजेचे आहे.