China Jiangmen Underground Neutrino Observatory JUNO : चीन नेहमीच काही तरी जगावेगगळे प्रयोग करत असतं. चीनचे हे चित्र विचित्र प्रयोग नेहमीच जगाला धडकी भरवणारे असतात. आता असाच एक प्लान चीनने हाती घेतला आहे. जमिनीच्या आत 700 मीटर खोल चीन गोलाकार आकाराची रहस्यमयी प्रयोगशाळा तयार करत आहे. यामध्ये शास्त्रज्ञ अणूच्या आकारापेक्षा लहान नो म्हणजेच अणूच्या आकारापेक्षा लहान कणांचे निरीक्षण करत आहे.
चीनच्या प्रयोगशाळांमध्ये होणारे प्रयोग नेहमीच जगाचे टेन्शन वाढवतात. चीनने कृत्रिम सूर्य तयार करुन संपूर्ण जगाला आश्चर्याचा धक्का दिला. यानंतर आता चीन आता विज्ञानाचे सर्वात मोठं रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करत आहे. जमिनीच्या आत 700 मीटर खाली आणि 35 मीटर व्यासाची गोल आकाराची प्रयोगशाळा उभारत आहे. चीन ग्वांगडोंग प्रांतातील कॅपिंग शहरात ही प्रयोगशाळा बांधण्यात येत आहे. जियांगमन अंडरग्राउंड न्यूट्रिनो लॅब अर्थात जुनो (China Jiangmen Underground Neutrino Observatory JUNO) असे या प्रयोगशाळेचे नाव आहे. या लॅबच्या उभारणीसाठी चीन तब्बल तीन हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. वर्षअखेरीस प्रयोग शाळा पूर्ण करण्याचे चीनचे टार्गेट आहे.
जमिनीच्या आत 700 मीटर खोल रहस्यमयी प्रयोगशाळाते चीन नेमकं काय संशोधन करणार असा प्रश्न संपूर्ण जगाला पडला आहे. या प्रयोग शाळेत चीन अणूच्या आकारापेक्षा लहान असलेल्या न्यूट्रिनोवर संशोधन करणार आहे. जगातील प्रत्येक गोष्ट ही अणूपासून बनलेली आहे. अणूच्या मध्यभागी एक केंद्रक असते. ज्याभोवती इलेक्ट्रॉन फिरतात. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन न्यूक्लियसच्या आत असतात. न्यूट्रिनो आणि न्यूट्रॉन सारखे वाटू शकतात, परंतु त्यांच्यामध्ये खूप फरक आहे. न्यूट्रिनो या सर्वांपेक्षा खूपच लहान म्हणजे अतिशय सूक्ष्म आहेत. संशोधक अनेक वर्षांपासून याचे संशोधन करत आहे. याचे वस्तुमान शून्य आहे असे मानले जाते. न्यूट्रिनो हे इलेक्ट्रॉनसारखे मूलभूत कण आहेत. मात्र, अणूचा भाग नाहीत. न्यूट्रिनो हे खंडित होऊ शकत नाहीत. वातावरणात मोठ्या प्रमाणावर न्यूट्रिनो असतात. प्रत्येक सेकंदाला सूर्याद्वारे तयार होणारे लाखो न्यूट्रिनो आपल्या शरीरातून प्रवेश करतात. वैज्ञानिक संशोधनात आतापर्यंत तीन प्रकारचे न्यूट्रिनो सापडले आहेत - इलेक्ट्रॉन न्यूट्रिनो, म्युऑन न्यूट्रिनो आणि टाऊ न्यूट्रिनो. JUNO प्रयोगशाळेत विविध प्रकारच्या न्यूट्रिनोचे वस्तुमान किती आहे यावर संशोधन करणार आहे.
Construction of the detector for China's Jiangmen Underground Neutrino Observatory (JUNO), a multipurpose neutrino experiment lab located 700m underground, has gone halfway through in Guangdong Province and will be completed by year-end. The JUNO is expected to operate in 2024. pic.twitter.com/u1VAnaQuei
— People's Daily, China (@PDChina) June 18, 2023