नवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यात सीमेवरुन सुरू असलेल्या संघर्षामुळे चीनने हजारो सैनिक, रणगाडे आणि सशस्त्र वाहने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (एलएसी) आणली आहेत. हे सैनिक भारताला लागून असलेल्या चीनच्या वायव्य भागात बस, गाड्या आणि विमानाने तैनात केले गेले आहेत. हे सर्व काम काही तासांत केले गेले आहे. जेणेकरुन चीन हे दाखवू शकेल की ते फारच कमी वेळात आपले सैन्य तैनात करण्यात ते तज्ज्ञ आहेत.
चीनने आपल्या हजारो पॅराट्रूपर्स चीनच्या मध्य प्रांत हुबेई येथून भारताच्या सीमेकडे वळवले आहेत. चीन भारताच्या सीमेवर आपल्या सैन्याची ताकद सातत्याने वाढवत आहे.
चीनने आपल्या सैन्याला सीमेजवळ आणण्यासाठी नागरी वाहतूक सेवा देखील वापरली आहे. चीनने जवानांना खासगी बस, खासगी कॉर्पोरेट विमाने आणि गाड्यांद्वारे सीमेवर आणले आहे.
या सैनिकांमध्ये पीएलए एअरफोर्सच्या पॅराट्रूपर्सच्या सैन्याचा समावेश आहे. या सैनिकांचा प्रवास चीनने काही तासात पूर्ण केला. यातील बहुतेक सैनिक हुबेईहून आणले गेले आहेत कारण बहुतेक चीनी सैन्य हुबेई प्रांतात पसरलेल्या कोरोना विषाणूचे वातावरण हाताळण्यात गुंतले होते. भारतीय सीमेजवळ तैनात केलेल्या हजारो सैनिकांनीही कोरोनाचा मुळ स्थान वुहानमध्ये ड्युटी बजावली आहे.
अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज असलेल्या सैनिकांव्यतिरिक्त, सीमेजवळ चीनने मोठे रणगाडे देखील आणले आहेत. या व्यतिरिक्त छोटे शस्त्रे व सैनिकही विमानाने भारतीय सीमेजवळ आणले आहेत.
चिनी सैन्याचे मेजर कर्नल माओ ली भारतीय सैनिक हद्दीत सैनिक आणि शस्त्रे नेण्याचे काम पहात होते. त्यांनी चीनची सरकारी मीडिया कंपनी चायना सेंट्रल टेलिव्हिजन (सीसीटीव्ही) ला सांगितले की थोड्याच वेळात आपण चीनच्या मध्य प्रांतातून भारताच्या सीमेपर्यंत सैन्य, शस्त्रे आणि रसद कशी नेऊ शकतो हे पाहू शकतो.
मेजर कर्नल माओ ली म्हणाले की हे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात आम्ही यशस्वी झालो. आमच्यासाठी ही एक मोठी गोष्ट आहे. त्याच वेळी, चिनी सैन्याच्या एका माजी वरिष्ठ अधिकाऱ्याने ग्लोबल टाईम्स वृत्तपत्राला सांगितले की, चीन आपल्या सैन्याला उंच ठिकाणी पोचवण्याचा सराव करीत आहे.
चीनमध्ये इतकी सामर्थ्य व क्षमता आहे की तो आपल्या सैनिकांना योग्य वेळी आपल्या देशाच्या कोपऱ्यात कोठेही पोहोचवू शकतो. चीन केवळ पॅराट्रूपर्सच नाही तर त्यांचे लढाऊ विमानं, सैन्य आणि रणगाडे देखील विषम परिस्थिती कोणत्याही ठिकाणी नेऊ शकते. तसेच, त्यांना लयबद्ध पद्धतीने एकत्र आक्रमण करण्याचा आदेशही दिला जाऊ शकतो. असं देखील या अधिकाऱ्याने म्हटलं आहे.
चीनच्या 76 व्या समूहाच्या लष्कराचे रणगाडे भारतीय सीमेजवळ तैनात करण्यात आले आहेत. हे रणगाडे पीएलए वेस्टर्न थिएटर कमांडच्या आहेत. ते लांब पल्ल्यासाठी प्रवास करू शकतात आणि लांब पल्ल्यात देखील हल्ला करू शकतात.
सध्या भारत आणि चीनमध्ये सीमावाद सुरु आहे. बर्याच वेळा वेगवेगळ्या ठिकाणी चेकपॉईंट्सवर दोघांचे सैनिक भिडले आहेत. अशा परिस्थितीत चीनने केलेली ही कारवाई चिथावणी देणारी आहे. शनिवारी भारतीय आणि चिनी सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. जी आतापर्यंत सकारात्मक राहिली आहे.
भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये राजकीय आणि सैन्य पातळीवर चर्चा सुरु आहेत. जेणेकरून हा सीमा वाद संपवता येईल.