पाकिस्तानचे भारताविरुद्धचे ते आरोप चीननं फेटाळले

पाकिस्तानच्या सैन्यानं भारतावर केलेल्या आरोपांचं चीननं खंडन केलं आहे. 

Updated: Nov 20, 2017, 11:11 PM IST
पाकिस्तानचे भारताविरुद्धचे ते आरोप चीननं फेटाळले  title=

बीजिंग : पाकिस्तानच्या सैन्यानं भारतावर केलेल्या आरोपांचं चीननं खंडन केलं आहे. भारतानं ५० कोटी डॉलरचा वापर करून एका गुप्तचर यंत्रणेची निर्मिती केली आहे. ही यंत्रणा चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरीडोअरमध्ये अडथळे तयार करण्यासाठी निर्माण करण्यात आली आहे, असा आरोप पाकिस्तानचे जॉईंट चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे जनरल जुबैर महमूद हयात यांनी केला होता. चीननं पाकिस्तानचे हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत.

भारताची गुप्तचर यंत्रणा रॉ सीपीईसीमध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहे. तसंच अशांत बलूचीस्तानमध्ये दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचं कामही भारत करत असल्याचा आरोप हयात यांनी केला होता.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लु किंग यांनी पाकिस्तानचे हे आरोप फेटाळून लावले आहेत. आमच्याकडे याबाबत कोणताही रिपोर्ट नाही. तसंच सीपीईसीला प्रादेशिक देश आणि आंतरराष्ट्रीय समुदाय समर्थन आणि मान्यता देईल, असा विश्वास लु किंग यांनी व्यक्त केला.