खुलासा! चीनी नौसेनेकडे आहे एक रहस्यमय स्पेशल फोर्स

जगभरात आपले उद्योग वाढवण्यासोबतच चीन आपल्या सेनेलाही शक्तीशाली करत आहे. चीन सेंट्रल टेलिव्हिजनच्या एका रिपोर्टमध्ये पीपल्स लिबरेशन आर्मी नेव्ही(PLAN)च्या एका रहस्यमयी फोर्सची माहिती दिली आहे.

Updated: Dec 23, 2017, 10:33 PM IST
खुलासा! चीनी नौसेनेकडे आहे एक रहस्यमय स्पेशल फोर्स title=
Image credit People's Daily

पेइचिंग : जगभरात आपले उद्योग वाढवण्यासोबतच चीन आपल्या सेनेलाही शक्तीशाली करत आहे. चीन सेंट्रल टेलिव्हिजनच्या एका रिपोर्टमध्ये पीपल्स लिबरेशन आर्मी नेव्ही(PLAN)च्या एका रहस्यमयी फोर्सची माहिती दिली आहे.

आत्तापर्यंत या यूनिटबाबत लोकांना फारच कमी माहिती होती. चीन मीडियामध्ये याबाबत लिहिलंही जात नाही. पहिल्यांदाच या शॅडो यूनिटबाबत जगाला सविस्तर माहिती देण्यात आली आहे. असे सांगितले जात आहे की, चीनने अशा अनेक गुप्त स्पेशल फोर्सेस तयार केल्या आहेत. 

यात सामिल होणं खूप कठिण

PLAN मरीन कोर अंतर्गत आहे. हा एक सुपर एलीट फोर्सेसचा ग्रुप आहे. ही फोर्स समुद्र, जमीन आणि आकाशा इतकेच नाहीतर खोल पाण्यातही ऑपरेशन करतात. समुद्री क्षेत्रात दहशतवाद्यां विरोधात ऑपरेशन करण्यासाठी चीनची ही स्पेशल फोर्स मात्तबर आहे. या एलिट ग्रुपमध्ये प्रवेश मिळवणं किती कठिण आहे याचा अंदाज या गोष्टीवरून येतो की, ट्रेनिंग दरम्यानच ५० टक्क्यांपेक्षा जास्त जवान फेल होता. 

कठोर ट्रेनिंग

पीपल्स डेली ऑनलाईनच्या रिपोर्टनुसार, कठोर प्रशिक्षण दरम्यान कमांडोच्या शारिरीक क्षमतेसोबत पॅराशूटिंग आणि पाण्याच्या आत ऑपरेशनने त्यांना पारखलं जातं. रात्री कठिण परिस्थीतींमध्ये त्यांचं ट्रेनिंग घेतलं जातं. त्यांना असं तयार केलं जातं जेणेकरून कोणत्याही परिस्थीती त्यांना सामना करता आला पाहिजे. 

स्पेशल फोर्सचं ऑपरेशन

या कोरने त्यांचं पहिलं ऑपरेशन पॅरामिलिट्री ऑपरेशन २६ डिसेंबर २००८ मध्ये अदनच्या खाडी आणि सोमालियाच्या समुद्र क्षेत्रात केलं होतं. यावर्षीच्या एप्रिलमध्ये याच एलिट ग्रुपच्या कमांडोंनी अदनच्या खाडीत समुद्री लुटे-यांच्या तावडीतून एका कार्गो शिपला सोडवले होते.