रोहिंग्या मुसलमानांच्या प्रश्नावर चीनी उपाय

रोहिंग्या मुसलमानांच्या प्रश्न सोडवण्यासाठी चीनने पुढाकार घेतला आहे. 

Updated: Nov 25, 2017, 09:16 PM IST
रोहिंग्या मुसलमानांच्या प्रश्नावर चीनी उपाय title=

रंगून : रोहिंग्या मुसलमानांच्या प्रश्न सोडवण्यासाठी चीनने पुढाकार घेतला आहे. 

चीनचा पुढाकार

चीनने तीन टप्प्यांची योजना सुचवली आहे. यात म्यानमार आणि बांगलादेश याचं सहकार्य अपेक्षित आहे. म्यानमार आणि बांगलादेश या दोन्ही देशांना हा प्रस्ताव मान्य असल्याचा दावा चीनने केला आहे. 

चीनची भूमिका

चीनी परराष्ट्र मंत्री वॅंग ही यांनी म्यानमार आणि बांगलादेशच्या नेत्यांची या संदर्भात भेट घेतली आहे. दोन्ही देशाच्या नेत्यांना त्यांनी ६,२०,००० रोहिंग्या निर्वासिंताचा प्रश्न सोडवण्यासाठी आग्रही सूचना केली आहे. 

काय आहे ती योजना

चीनच्या सूचनेप्रमाणे ही योजना तीन टप्प्यात अंमलात आणायची आहे.
पहिल्या टप्प्यात म्यानमारने रोहिंग्याच्या विरोधातील लष्करी कारवाई थांबवायची आहे ज्यामुळे राखीने प्रांतातून त्यांचं स्थलांतर थांबेल. त्याबरोबरच बांगलादेशात गेलेल्या निर्वासितांचा म्यानमारमध्ये परतण्याचा मार्ग मोकळा होईल. दुसऱ्या टप्प्यात रोहिंग्याचा प्रश्न सोडवण्यासाठी म्यानमार आणि बांगलादेशने राजनैतिक संबंध सृदृढ करण्यावर भर द्यायचा आहे. तिसऱ्या टप्प्यात आंतरराष्ट्रीय मदतीतून राखीने प्रांतातील गरीबी दूर करण्यासाठी आणि विकासासाठी पावलं उचलायची आहेत. यातून दिर्घ कालीन शांतता निर्माण होईल. 

चीनचा दुटप्पीपणा

एका बाजूला चीन म्यानमार आणि बांगलादेशमध्ये शांतता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतोय तर दुसरीकडे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला खतपाणी घालतोय. यात चीनचा दुटप्पीपणा दिसूल येतो. सुपरपॉवर म्हणून स्वत:ची प्रतिमा निर्माण करण्यासाठी चीनची धडपड सुरू आहे.