अबब... या वाटीची किंमत तब्बल २४८ कोटी रुपये

हाँगकाँगमध्ये मातीची वाटी तब्बल २०० कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीत विकली गेली आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Oct 9, 2017, 05:59 PM IST
अबब... या वाटीची किंमत तब्बल २४८ कोटी रुपये title=
Image: Asian Art Museum

हाँगकाँग : एक वाटी जास्तित जास्त किती महाग असू शकते? जर ती वाटी सोनं किंवा हिऱ्यांची असेल तर त्याची किंमत कोटींपेक्षा अधिक नसेल. मात्र, हाँगकाँगमध्ये मातीची वाटी तब्बल २०० कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीत विकली गेली आहे.

चीनी मातीची ही वाटी २०० कोटींपेक्षा अधिक रुपयांना विकली आहे. ही वाटी कुणी खरेदी केली आहे या संदर्भात अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये. आश्चर्याची गोष्ट म्हणजे लिलावात ही वाटी केवळं २० मिनिटांत विकली गेली आहे.

ही आहे खास बाब

ही साधारण दिसणारी वाटी चीनमधील सांग राजवंश यांच्या काळातील म्हणजे एक हजार वर्ष जुनी आहे. या वाटीचा रंग निळा आणि हिरवा आहे. वाटीचा आकार १३ सेंटीमीटर आहे. खेरदी करणाऱ्या व्यक्तीने या वाटीसाठी ३८ मिलियन डॉलर म्हणजेच भारतीय चलनात जवळपास २४८ कोटी रुपयांची बोली लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्शन हाऊस सोथबे येथे झालेल्या लिलावात या वाटीसाठी १०.२ मिलियन डॉलरपासून सुरु झाली. काहींनी फोनवरही बोली लावली तर काही लिलाव सुरु असलेल्या रुममध्ये उपस्थित होते. केवळ २० मिनिटांतच या वाटीसाठी २०० कोटी रुपयांपेक्षा अधिकची बोली लागली आणि नंतर २४८ रुपयांपर्यंत पोहोचली. चीनी मातीची ही वाटी कुणी खरेदी केली याची माहिती अद्याप उघड करण्यात आलेली नाहीये.

यापूर्वी २०१४ मध्ये चीनमधीलच मिंग राजवंश यांच्या काळातील एक दारुचा प्याला ३६ मिलियन डॉलरमध्ये विकला गेला होता. चीनमधील व्यावसायिक ली यिकियान यांनी खरेदी केला होता. ली यिकियान हे यशस्वी व्यावसायिक बनण्यापूर्वी टॅक्सी चालविण्याचं काम करत असतं असे म्हटले जाते.